How Much Salt Consume In A Day : मीठाचं जास्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मीठाचं खूप कमी प्रमाणात सेवन केल्यानेही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कमी मीठ खाण्याचं ट्रेंड आणि यामुळे होणाऱ्या समस्यांबाबत सेलिब्रिटीज फिटनेस एक्सपोर्ट आणि न्यूट्रिशनिस्ट पूजा मखीजा यांनी माहिती दिलीय. त्यांनी म्हटलंय की, हाय ब्लड प्रेशरच्या भीतीमुळे लोक मीठाचं सेवन पूर्णपणे सोडतात. पण मीठाचं खूप कमी प्रमाणात सेवन करणंही शरीरासाठी खतरनाक ठरू शकतं.
यामुळे किडनी,हार्मोन,मेंदू आणि मांसपेशींवर प्रभाव पडतो. त्यांनी म्हटलं की, मीठ कमी प्रमाणात खाल्ल्याने किडनीवर अतिरिक्त दबाव येतो. तसच रेनिन, एंजियोटेंसिन आणि एल्डोस्टेरोनसारखे हार्मोन वाढतात. यामुळे ब्लड प्रेशरमध्ये चढ-उतार निर्माण होतो आणि नसांवर तणाव वाढतो. ही परिस्थिती दिर्घकाळ सुरु राहिल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हा धोका आणखी वाढू शकतो. सोडियमचं कमी प्रमाण असल्यास, इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. ब्लड शुगर कमी होतं.
एक्स्पर्टच्या माहितीनुसार, यामुळे मेटाबॉलिज्म पूर्णपणे बिघडतो. ज्यामुळे डाएबिटीजवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. खूप दिवस मीठाचं कमी प्रमाणात सेवन केल्यास हायपोनेट्रेमियासारखी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे रक्तात सोडियमचं प्रमाण कमी होऊ शकतं. यामुळे थकवा, डोकेदुखी, मांसपेशीच्या समस्या निर्माण होतात. तसच गंभीर केसेसमध्ये हार्ट अटॅकही येऊ शकतो.
नक्की वाचा >> महिलांनो! चुकीच्या पद्धतीने लघवी करता? 'ही' आहे Urine करण्याची योग्य पोजिशन, अजिबात होणार नाही इन्फेक्शन!
जिममध्ये व्यायाम करताना चक्कर का येते?
पूजाने तिचा अनुभव शेअर करत म्हटलंय की, मी अनेकदा लोकांना जिममध्ये व्यायाम करताना चक्कर आल्याच्या तक्रारी ऐकल्या आहेत. ज्याचं मुख्य कारण सोडियमचं होतं. सोडियम नर्व सिग्नल आणि मांसपेशी संकुचनसाठी आवश्यक असतं. मीठाच्या कमी प्रमाणामुळे जिम परफॉरमन्सवर परिणाम होतो. तसच स्ट्रेस हार्मोनही बिघडतो. नस आणि मांसपेशी कमकुवत होतात. अनेक रिसर्चमध्ये म्हटलंय की, मीठाचं कमी प्रमाणात सेवन केल्यास, हृदयाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
नक्की वाचा >> Women Health Issues : आई होण्यापासून ते मेनोपॉजपर्यंत..शरीरात कोणकोणते बदल होतात? प्रत्येक महिलेला माहितच हवं
मीठाचं सेवन कसं कराल?
या मोठ्या समस्येसाठी उपायही सोपा आहे. यासाठी घरात मिनरल वॉटर तयार करा. या शुद्ध पाण्यात चिमूटभर मीठ मिसळा. एक लीटर पाण्यात छोट्या चमच एवढं मीठ पुरसे आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहतं. मिनरल्समुळे थकवा दूर होतो. पण एखादं आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, तुम्ही प्रत्येक दिवस 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाऊ शकता.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world