जाहिरात

महिलांनो! चुकीच्या पद्धतीने लघवी करता? 'ही' आहे Urine करण्याची योग्य पोजिशन, अजिबात होणार नाही इन्फेक्शन!

Best Way To Urinate :  रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक अशा गोष्टींवर लक्ष देत नाहीत, जे आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. लघवी करण्याची पद्धतही त्यांच्यातील एक भाग आहे. विशेषत: महिलांनी लघणी करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

महिलांनो! चुकीच्या पद्धतीने लघवी करता? 'ही' आहे Urine करण्याची योग्य पोजिशन, अजिबात होणार नाही इन्फेक्शन!
Best Way To Urinate For Woman
मुंबई:

Proper Way To Urinate :  रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक अशा गोष्टींवर लक्ष देत नाहीत, जे आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. लघवी करण्याची पद्धतही त्यांच्यातील एक भाग आहे. विशेषत: महिलांनी लघणी करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्या पोजिशनने लघवी करणं सर्वात हेल्दी आहे आणि कोणत्या सवयींमुळे यूरिन इन्फेक्शन किंवा पेल्विक हेल्थसंबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात. आजच्या या लाईफस्टाईल रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. बसून लघवी करणं चुकीचं आहे? महिलांसाठी यूरिन करण्याची योग्य पोजिशन कोणती? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

बसून लघवी करणं चुकीचं आहे?

नाही..बसून लघवी करणं चुकीचं नाही. उलट ही पद्धत महिलांसाठी नैसर्गिक आणि खूप हेल्दी मानली जाते. बसल्याने तुमचे पेल्विक मसल्स पूर्णपणे रिलॅक्स होतात. यामुळे यूरिन पूर्णपणे बाहेर पडते आणि ब्लॅडर रिकामं होतं. उभं राहून किंवा थोडं वाकून यूरिन केल्याने यूरिन थांबू शकते. यामुळे सतत लघवीला येण्याची समस्या (UTI) उद्धवू शकते. महिलांना लघवी करण्यासाठी टॉयलेट सीटवर बसावं लागतं. यामुळे त्यांना पुरुषांच्या तुलनेत संसर्गाचा जास्त धोका असतो. यामुळे डॉक्टरही सल्ला देतात की, बसून आरामात लघवी करणं योग्य असतं.

नक्की वाचा >> Manoj Jarange Murder Plan: धनंजय मुंडेंचं काय खरं नाय! मनोज जरांगेंची SP कार्यालायत धाव, 'त्या' 15 लोकांनी..

महिलांसाठी सर्वात चांगली पोजिशन आहे..टॉयलेट सीटवर बसून यूरिन करणं. लघवी करताना या सीटवर पूर्ण पोजिशनमध्ये बसावे. अर्ध्या-अर्ध्या पोजिशनमध्ये बसू नये. जेव्हा तुम्ही पूर्णपणे बसता, तेव्हा तुमच्या मांसपेशी सैल होतात. यामुळे यूरिनचा फ्लो नॅचरल होतो. काही महिला भीतीपोटी पब्लिक टॉयलेटमध्ये उभं राहून यूरिन करतात. यामुळे यूरिन पूर्णपणे बाहेर पडत नाही. यामुळे यूरिन ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतं.

लघवी करण्याची योग्य पद्धत कोणती?

आरामात बसून लघवी करणं, हीच योग्य पद्धत आहे. लघवी थांबवून ठेऊ नये. तसच लघवी करताना जोर लावू नये. जेव्हाही तुम्हाला लघवीला येईल, तेव्हा लघवी खांबवून ठेऊ नका. यामुळे आरोग्यास समस्या निर्माण होऊ शकते. लघवी करताना शरीर सैल ठेवा. पोटावर किंवा खाली जास्त जोर लावू नका. लघवी केल्यानंतर टिशू किंवा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होणार नाही. पर्सनल हायजीनची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. विशेषत: मासिक पाळी दरम्यान.

नक्की वाचा >> Viral Video दूध, आंघोळ अन् बरंच काही...कुटुंबीयांनी मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचं केलं भन्नाट सेलिब्रेशन!

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com