Women Health Problems After Menopause : तारुण्यापासून ते आई होण्यापर्यंत आणि त्यानंतर मेनोपॉज..महिलांच्या शरीरात असे अनेक मोठे बदल होतात. प्रत्येक टप्प्यात शरीरात काहीतरी नवीन बदल घडत असतात. या प्रवासात हार्मोन्समध्ये मोठे चढ-उतार होत असतात. ज्यामुळे शरीरच नाही, तर मनावरही प्रभाव पडतो. अशातच जाणून घेऊयात की, आई बनण्यापासून मेनोपॉजपर्यंत महिलांच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
टीनएज : मुलींमध्ये साधारणपणे 11 ते 14 वर्षांच्या दरम्यान हार्मोन्स (संप्रेरके) बदलायला लागतात. याच हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळीची (Periods) सुरुवात होते. हे या गोष्टीचे संकेत आहे की आता शरीर गर्भधारणेसाठी (Pregnancy) तयार होत आहे. या काळात शरीरात अनेक शारीरिक बदल घडतात. जसे की, स्तनांची वाढ (Breast Growth), शरीरावर हलके केस येणे, मनःस्थितीत बदल (Mood Swings), चिडचिडेपणा किंवा हार्मोनल बदल घडत असतात.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा अनुभव
आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अनुभव असतो, पण हा अनुभव केवळ भावनिकच नाही, तर शारीरिकदृष्ट्याही खूप मोठा बदल घडवून आणतो. गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) शरीरातील इस्ट्रोजेन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) या हार्मोन्सचे (संप्रेरकांचे) प्रमाण खूप वाढते. यामुळे बाळाची वाढ होते, पण त्याचबरोबर अनेक बदलही येतात. जसे की, थकवा आणि जास्त झोप येणे, मनःस्थितीत बदल (Mood Swings), शरीराचे वजन वाढणे, पोट आणि कमरेत वेदना होणे, त्वचा आणि केसांमध्ये बदल होणे. हे सर्व शरीराच्या तयारीचा भाग असते, जेणेकरून बाळ निरोगीपणे जन्म घेऊ शकेल.
नक्की वाचा >> सीमा, सरस्वती की रश्मी...? लोकसभेत 22 वेळा बोगस मतदान? 'ही' हिरोईन आहे तरी कोण?
डिलिव्हरीनंतरची वेळ
बाळाच्या जन्मानंतर महिला 'पोस्टपार्टम फेज'मध्ये (Postpartum Phase - प्रसूतीनंतरच्या टप्प्यात) प्रवेश करतात. यावेळी शरीर हळूहळू पूर्ववत होते आणि गर्भधारणेदरम्यान वाढलेले हार्मोन्स (संप्रेरके) पुन्हा सामान्य पातळीवर येतात. अनेकदा या काळात स्त्रियांना पोस्टपार्टम डिप्रेशन (Postpartum Depression - प्रसूतीपश्चात नैराश्य) देखील येऊ शकते, ज्यामध्ये त्या दुःखी, थकलेल्या किंवा अस्वस्थ वाटू लागतात. या काळात शरीराला आराम देणे, पौष्टिक आहार घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे असते.
मेनोपॉजपर्यंतचा प्रवास
40 वर्षांच्या आसपास महिलांचे हार्मोन्स (संप्रेरके) पुन्हा बदलायला लागतात. या वेळेला पेरीमेनोपॉज (Perimenopause) म्हणजेच मेनोपॉजच्या (रजोनिवृत्तीच्या) आधीचा टप्पा म्हणतात. या टप्प्यात मासिक पाळी (Periods) अनियमित होऊ शकते. कधी लवकर येणे, कधी उशिरा, कधी खूप कमी रक्तस्राव तर कधी खूप जास्त. हळूहळू जेव्हा सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही, तेव्हा त्याला 'मेनोपॉज' (रजोनिवृत्ती) म्हटले जाते.
नक्की वाचा >> Love Jihad : 2 मुस्लीम भाऊ आणि 1 हिंदू मुलगी.. एकाने बाथरूममध्ये केलं सर्वात घाणेरडं कृत्य, चीड आणणारी घटना!
आई होण्यापासून ते मेनोपॉजपर्यंत...
- हे वय साधारणपणे 45 ते 55 वर्षांदरम्यान असते.
- मेनोपॉजदरम्यान शरीरात काय-काय बदल होतात?
- मनोपॉज कोणताही आजार नाही. पण एक नैसर्गिक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. पण त्याचसोबत शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात.
- अचानक शरीरात उष्णता जाणवणे (Hot Flashes), चेहरा लाल पडणे आणि रात्री घाम येणे ही खूप सामान्य लक्षणे आहेत.असे इस्ट्रोजेन हार्मोनची (संप्रेरकाची) पातळी कमी होऊ लागल्यामुळे होते.
- योनीची (Vagina) आद्रता (ओलावा) कमी होते, ज्यामुळे संबंध ठेवताना अस्वस्थता किंवा जळजळ जाणवू शकते.
- रात्री घाम येणे, मूड स्विंग्स आणि चिंतेच्या कारणामुळे झोपेवर ताण येतो.
- मेटाबॉलिज्म हळू झाल्याने पोटाच्या जवळपास चरबी वाढते.
- एस्ट्रॉजनच्या कमतरतेमुळं कॅल्शियमचं प्रमाण घटतं. ज्यामुळे ऑस्टियोपोरासिस म्हणजे हाडे कमकुवत होण्याची समस्या उद्धवू शकते.
- हार्मोनमध्ये झालेले बदल थेट मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. अनेक महिलांमध्ये तणाव, चिडचिडपणा आणि चिंतेची समस्या निर्माण होते.
- केस आणि त्वचेत बदल होतात. त्वचा लूज होते आणि त्वचा कोरडीही होते. केस पातळ आणि कमकुवत होतात.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world