Shravan non-vegetarian food Avoid : श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. यादरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. यादरम्यान मांसाहार, लसून, कांदा सारख्या तामसी पदार्थ खाणं वर्ज्य मानलं जातं. सर्वसाधारणपणे यामागे धार्मिक कारण सांगितलं जातं. मात्र यामागे वैज्ञानिक आणि आरोग्यासंबंधित दृष्टिकोन लपलेला आहे.
पचन शक्ती मंदावते, म्हणून...
आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात मांसाहार न करण्याबाबत सांगण्यात आलं आहे. आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात शरीरातील जठराग्नि म्हणजेच पचन शक्ती इतर दिवसांच्या तुलनेत अत्यंत मंदावते. पावसाळ्यात वातावरणातील तापमान आणि दमटपणा शरीरातील पचनक्रिया मंदावते. कारण मांसाहारी आहारात प्रोटीन आणि फॅटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे याचं पचन करण्यासाठी शरीराला बराच वेळ आणि मेहनत लागते.
कमकुवत पचन शक्तीमुळे भारी आणि मांसाहारी भोजन केल्यानंतर गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे आणि अपचन सारख्या अनेक शारिरीक समस्या उद्भवतात. त्यामुळे या काळात हलका आहार घेणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पावसाळ्यात श्रावणाचा महिना येतो. या काळात हवेत दमटपणा असतो. यामुळे सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्यासाठी अनुकूल स्थिती असते.
श्रावणात मांसाहार केल्याने काय होतं?
या काळात मटण, चिकन किंवा मासे योग्य तापमानात ठेवले नाही किंवा योग्य पद्धतीने शिजवले नाही तर ते लवकर खराब होतात. याशिवाय त्यात बॅक्टेरिया वाढीस लागतात. असे मांस खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन, फूड पॉइजनिंग आणि डायरियासारख्या आजारांची जोखीम अनेक पटीने वाढते. प्राचीन काळात फ्रीजची सुविधा नसल्यामुळे या आजारांपासून बचाव करण्यासाठी मांसाहार बंद केला जात होता. मान्सूनदरम्यान पचनक्षमता कमकुवत होत असल्याने आरोग्य विशेषज्ञ ताजा, हलका आणि सहज पचणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
या काळात हिरव्या भाज्या, साधा आहार घेतल्याने शरीराला आवश्यक पोषणसह पचन तंत्रावर अतिरिक्त दाब येत नाही. आयुर्वेदात या गोष्टीचा विशेष उल्लेख आहे की, पावसाळ्यात असा आहार घ्यावा जो शरीराला ऊर्जा देईल, मात्र पोटात जडपणा येणार नाही.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world