- डॉ. रुचा पै
Dry Cough Remedies: वातावरणातील सतत बदलामुळे, धूळ, थंडी, एसी आणि घशातील कोरडेपणा यामुळे कोरड्या खोकल्याची समस्या वाढते. रात्री तर हा खोकला इतका त्रास देतो की ढास लागते, छातीत दुखू लागते आणि झोप पूर्ण होत नाही. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी डॉ. रुचा पै यांनी सांगितलेले 10 उपाय जाणून घेऊया...
कोरडा खोकला कमी करण्यासाठी 10 उपाय | 10 Home Remedies For Dry Cough
1. गरम पाण्याच्या गुळण्या
रात्री झोपण्यापूर्वी एक - दोन मिनिटे गरम पाण्याने गुळण्या करा.
घशातील चिकट स्त्राव स्वच्छ होईल, घशातील खवखव कमी होईल.
पाण्यामध्ये मीठ मिक्स केलं तरी चालेल आणि नाही केले तरीही चालेल.
2. कोमट पाणी
झोपताना बेडच्या बाजूला कोमट पाण्याचा ग्लास ठेवा.
खोकल्याची उबळ आली की दोन घोट पाणी प्या.
घशातील शोष कमी होतो.
3. आहारात बदल
रात्रीच्या वेळेस खालील पदार्थांचे सेवन करणं टाळा
तळलेले / तेलकट पदार्थ
फरसाण, चिवडा, बाकरवडी
हे पदार्थ घशावर तवंग तयार करून खवखव आणि कोरडा खोकला वाढवतात.
4. लवंग + मध
चार ते पाच लवंग तव्यावर भाजून घ्या.
लवंग थंड झाल्यानंतर जाडसर कुटून घ्या.
लवंग पावडर तीन चमचे शुद्ध मधात मिसळा.
दिवसातून दोन ते तीन वेळा आणि रात्री झोपण्यापूर्वीही या मिश्रणाचे सेवन करावे.
घशातील खवखव आणि खोकला कमी होईल.
5. ज्येष्ठमध (Yashtimadhu)
रात्री ज्येष्ठमधाची काडी चघळत राहा.
घशाची खवखव, सतत ढास लागण्याची समस्या कमी होईल.
बसलेल्या आवाजाची समस्याही कमी होईल.
(नक्की वाचा: Why Do You Yawn: दुसऱ्याला पाहून आपल्यालाही जांभई का येते? या 4 गोष्टी 99% लोकांना माहितीही नसतील)
6. अडुळसा (Adulsa) काढा
चार ते पाच अडुळशाची पाने पाण्यात उकळून काढा तयार करा.
दिवसातून तीन ते चार वेळा काढा प्यावा.
कोरडा खोकला आणि घशातील दाह कमी करण्यासाठी उत्तम उपाय.
7. वाफ (Steam)
कफ पातळ होईल, श्वसनलिका स्वच्छ होईल. पाण्यात ओवा मिक्स करून वाफ घेतली तर आणखी आराम मिळेल.
8. हळद आणि गरम दूध (Turmeric Milk)
कधी वापरायचा?
रात्रीच्या वेळेस खोकल्याची समस्या वाढत असल्यास उपाय करावा.
घशातील दाह, सूज, जळजळ, घशामध्ये संसर्ग झाला असल्यास हळदीचे दूध प्यावे.
(नक्की वाचा: How To Stop Snoring: घोरण्याच्या समस्येतून सुटका मिळवायचीय? फॉलो करा 10 जबरदस्त टिप्स)
हळदीचे दूध कसे तयार करावे?
एक ग्लास गरम दुधात ¼ चमचा हळद मिक्स करा.
झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे (कफयुक्त खोकला खूप असेल तर दूध टाळावे)
कोरडा खोकला, रात्रीच्या वेळेस खोकला वाढत असेल तर दोन कप पाण्यात एक चमचा अळशी उकळा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये मध मिक्स करा. रात्रीच्या वेळेस हा उपाय करावा.
10. सूंठ + गूळ + तूप + हळदीचा उपाय(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

