जाहिरात

Cracked Heels: थंडीत भेगा पडलेल्या टाचांमुळे खूप त्रास होतो का, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे टाचांना भेगा?

Cracked Heels: थंडीत भेगा पडलेल्या टाचांच्या समस्येपासून सुटका कशी मिळवावी? शरीरातील कोणत्या कमतरतेमुळे टाचांना भेगा पडतात?

Cracked Heels: थंडीत भेगा पडलेल्या टाचांमुळे खूप त्रास होतो का, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे टाचांना भेगा?
"Cracked Heels: टाचांना भेगा पडण्यामागील प्रमुख कारणं"
Canva

Cracked Heels: टाचांना भेगा पडण्याची समस्या सामान्य आहे. हिवाळा असो किंवा उन्हाळा बहुतांश लोक या समस्येमुळे त्रासलेले असतात. मोठ-मोठ्या भेगांमुळे चालणे-फिरणेही त्रासदायक ठरते. कित्येकदा भेगांमधून रक्तही येते यामुळे वेदनाही खूप वाढतात. टाचांना भेगा कोणत्या पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे पडतात, यावर कोणते उपाय करावे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

टाचांना भेगा का पडतात? (Cracked Heels Causes)

आपल्या टाचांच्या भागातील त्वचा शरीराच्या अन्य भागाच्या तुलनेने जाड असते. पण टाचांची त्वचा कोरडी झाल्यास, पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास किंवा नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी झाल्यास त्वचा कडक होऊन भेगा पडू लागतात. हार्मोनल बदल, थायरॉइड, सोरायसिस, मधुमेह यासारख्या कारणांमुळेही टाचांना भेग पडू शकतात. तसेच टाचांना भेगा पडणे हे केवळ त्वचा कोरडी होण्याची समस्या नव्हे तर त्वचा आणि आरोग्याशी संबंधित संकेत आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे टाचांना भेगा पडतात? (Which Vitamin Causes Cracked Heels)

टाचांना भेगा पडण्याची समस्या केवळ हवामान बदलामुळे निर्माण होत नाही. बहुतांश वेळेस आवश्यक पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळेही टाचांना भेगा पडू शकतात. त्वचेमध्ये महत्त्वाच्या व्हिटॅमिन्स आणि खनिजांची कमतरता निर्माण होते, त्यावेळेस त्वचेचे आरोग्य बिघडते. 

व्हिटॅमिन E ची कमतरता  

व्हिटॅमिन E त्वचेसाठी एखाद्या कवचाप्रमाणे काम करते, जे त्वचेच्या पेशींमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा मऊ आणि लवचिक राहते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज होते.  टाचांची त्वचाही कोरडी होऊन भेगा पडू लागतात.  

Latest and Breaking News on NDTV

व्हिटॅमिन C ची कमतरता  

व्हिटॅमिन C हे त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते, यामुळे त्वचेसाठी आवश्यक असणारे कोलेजनचे उत्पादन करण्यासही मदत मिळते. कोलेजनमुळे त्वचा निरोगी आणि मऊ होते. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण झाल्यास त्वचेच्या नवीन पेशी तयार होऊ शकत नाहीत. परिणामी टाचांना खोलवर भेगा पडतात आणि वेदनाही खूप होतात.   

व्हिटॅमिन B ची कमतरता  

व्हिटॅमिन B3 (नायसिन), व्हिटॅमिन  B7 (बायोटिन) त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत मिळते. या व्हिटॅमिन्सच्या कमतरता निर्माण झाल्यास त्वचा पातळ, नाजूक होते. दीर्घकाळ शरीरामध्ये या व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण झाल्यास टाचांनाही भेगा पडू लागतात. तसेच टाचांना खाज येणे, जळजळ होणे या समस्याही उद्भवतील. 

Latest and Breaking News on NDTV
झिंक आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड

झिंकमुळे शरीरातील जखमा भरून येण्यास आणि नवीन त्वचेच्या निर्मितीची प्रक्रिया जलद होईल. झिंकचे प्रमाण कमी झाल्यास टाचांना भेगा पडल्यानंतर ही समस्या लवकर ठीक होत नाही, कधीकधी इतक्या मोठ्या भेगा पडतात की चालणंही शक्य होत नाही. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड त्वचेतील नैसर्गिक तेलाची पातळी संतुलित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, नैसर्गिक तेलाचे संतुलन बिघडले तर त्वचा कोरडी होते परिणामी टाचांना भेगा पडू लागतात.  

फटी एड़ियां

भेगा पडलेल्या टाचा

टाचांना भेगा पडल्यास काय करावे? (Cracked Heels Remedies)

Methi Dana Benefits: 14 दिवस मेथी दाणे खाल्ल्यास शरीरात काय होईल? कोणते आजार दूर होतील, वेटलॉस कसा होईल?

(नक्की वाचा: Methi Dana Benefits: 14 दिवस मेथी दाणे खाल्ल्यास शरीरात काय होईल? कोणते आजार दूर होतील, वेटलॉस कसा होईल?)

डाएटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? (Heels Crack Nutrient Deficiency)
  • व्हिटॅमिन E : बदाम, पीनट बटर, सूर्यफुलाच्या बिया, अ‍ॅव्होकाडो
  • व्हिटॅमिन C : आवळा, लिंबू पाणी, संत्रे, टोमॅटो, ब्रॉकली
  • बायोटिन : केळी, अंडी, ओट्स, शेंगदाणे
  • झिंक : काजू, चणे, राजमा, भोपळ्याच्या बिया
  • ओमेगा-3 : अळशीच्या बिया, अक्रोड, मोहरीचे तेल 

थंडीत 30 दिवस लाल ज्युस पिण्याचे अद्भुत फायदे, चेहऱ्यावर इतका ग्लो येईल की ब्युटी पार्लरमध्ये जाणं कराल बंद

(नक्की वाचा: थंडीत 30 दिवस लाल ज्युस पिण्याचे अद्भुत फायदे, चेहऱ्यावर इतका ग्लो येईल की ब्युटी पार्लरमध्ये जाणं कराल बंद)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com