कोकणात अनेक समुद्र किनाऱ्यांवर कासवांच्या ऑलिव्ह रिडले प्रजातीसह अनेक प्रजातींचे संवर्धन केले जाते. त्यांची अंडी आणि घरटी सुरक्षित ठेवण्यात येत आहे. त्यातील एक समुद्र म्हणजे मिठमुंबरी सुमद्र. रविवारी मिठमुंबरी समुद्र किनाऱ्याहून एका घरट्यातून 123 अंड्यापैकी 81 पिल्ले तर दुसऱ्या घरट्यातून 95 पैकी 37 पिल्ले सुखरुप समुद्रात सोडण्यात आली. दोन्ही घरट्यांतील मिळून सुमारे 118 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. सुमारे 53 दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर पडून समुद्राकडे झेपावली. यावेळी वन विभागाचे कर्मचारी ही तिथे उपस्थित होते.
कन्हैया कुमार लोकसभेच्या रिंगणात, काँग्रेसकडून भाजपच्या 'या' खासदाराला देणार आव्हान
ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची अंडी 20 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजून15 मिनिटांनी घरट्यात जमा करण्यात आली होती. पिल्लांना तब्बल 53 दिवसांनी अंड्यातून बाहेर काढण्यात आले. कासव संवर्धनच्या माध्यमातून वन विभाग सावंतवाडी, कांदळवन कक्ष मालवण व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून आगामी काळात मिठमुंबरी किनाऱ्यावर कासव महोत्सव आयोजित करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. या महोत्सवाद्वारे ग्रामस्थ व पर्यटकांना कासव संवर्धनाचे महत्त्व व येथील जैवविविधतेची परिपूर्ण माहिती मिळेल.
रोहित शर्माची शतकी इनिंग व्यर्थ, 20 रन्सनी चेन्नई ठरली 'सुपरकिंग'
या वेळी वन विभागाचे वनरक्षक नीलेश साठे, वनमजूर कृष्णा सुद्रिक यांच्यासह कांदळवन समितीचे किनारा व्यवस्थापक लक्ष्मण तारी, गाबीत समाजाचे तालुकाध्यक्ष संजय पराडकर, प्रियांका तारी आदी उपस्थित होते. ही कासव संवर्धन मोहीम राबविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ नारायण तारी, मयूरेश तारी, ओमकार तारी यांनी मेहनत घेतली. यावेळी ग्रामस्थ प्रमोद आडकर, रोहन तारी, अभय पराडकर, नंदकिशोर पराडकर, हितेश खवळे, भूषण टिकम आदि उपस्थित होते.