महायुतीत मिठाचा खडा! अमरावतीत नवनीत राणांची बंडखोरी, CM शिंदेंचा इशारा

लोकसभेत नवनीत राणांनी काम न केल्यामुळे नाराज असलेल्या भाजप नेत्या नवनीत राणा व आमदार रवी राणांनी सुरुवातीपासूनच अभिजीत अडसूळ यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. त्यांचा हा विरोध आता टोकाला गेलाय. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती

अमरावतीच्या दर्यापुरात महायुतीत मोठी बंडखोरी झाली आहे. ही बंडखोरी दस्तूरखुद्द भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी दर्यापूर विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रमेश बुंदिले यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याच बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा थेट मैदानात उतरल्या असून दर्यापूर विधानसभेत नवनीत रानांनी प्रचार सभांचा धडाका सुरू केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान नवनीत राणा यांनी आनंद अडसूळ आणि अभिजीत अडसूळ पिता-पुत्रांवर 900 कोटींच्या बँक घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडालेली असतानाच दुसरीकडे आता महायुतीतील भाजप आणि शिंदे सेना या दोन मोठ्या पक्षातील संबंध ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अमरावतीच्या दर्यापुरातील विधानसभेची जागा महायुतीतून शिवसेना शिंदे गटाला सुटली असून उमेदवारी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना देण्यात आली आहे. लोकसभेत नवनीत राणांनी काम न केल्यामुळे नाराज असलेल्या भाजप नेत्या नवनीत राणा व आमदार रवी राणांनी सुरुवातीपासूनच अभिजीत अडसूळ यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. त्यांचा हा विरोध आता टोकाला गेलाय. 

( नक्की वाचा : 'PM मोदींना नोबेल शांतता पुरस्कार द्या', दिग्गज गुंतवणूकतज्ज्ञांनी केली मागणी )

मुख्यमंत्र्यांचा राणा दाम्पत्याला इशारा

महायुतीमध्ये कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. महायुतीमध्ये सरकार तुमच्या पाठीशी उभे राहिले आहे. महायुतीमध्ये कॅप्टन अभिजीत असून देखील सरकारला गरज आहे. महायुतीची शिस्त राणा दाम्पत्याने पाळावी. महायुतीत राहून बंडखोरी करू नये, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. तसेच 20 तारखेला कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचं विमान उडवा, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे.

Advertisement

( नक्की वाचा : '.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा )

नवनीत राणांचा हल्लाबोल

भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या थेट आता अभिजीत अडसूळविरुद्ध मैदानात उतरल्या आहेत. दर्यापूर तालुक्यात सभा घेत बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी रमेश बुंदेल यांना दर्यापूरकरांनी निवडून द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हे आवाहन करत असतानाच राणांनी अडसूळ पिता-पुत्राविरुद्ध दंड थोपाटत त्यांचा मुंबईचं पार्सल चार फुट्या आणि दीड फुट्या असा उल्लेख केला.  तसेच अडसुळांवर 900 कोटींच्या बँक घोटाळ्यांचा आरोप देखील केला. 

नवनीत राणा यांनी महायुतीतील शिंदे गटाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्याविरुद्ध थेट भूमिका घेतल्यामुळे पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि अडसूळ पितापुत्र यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या दोघांच्या राजकीय वादामुळे भाजप आणि शिंदे गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Advertisement