
राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्याचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. शिवाय जनावरांचेही जीव गेले आहेत. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यांनी नुकसानीची जी आकडेवारी दिली आहे ती धक्कादायतक आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील 19 जिल्ह्यांन फटका बसला आहे. त्यात तब्बल 20 लाख 12 हजार 775 एकर क्षेत्र हे बाधीत झालं आहे. त्यावर चे पिक पुर्ण पणे नष्ट झाले आहे.
या क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासह अन्य पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. वाशिममध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.राज्यात सर्वाधिक 7 लाख 13 हजार 857 एकर क्षेत्राचे नुकसान एकट्या नांदेड जिल्ह्यात झाले आहे. त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 392 एकर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झालं आहे.
मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात असल्याचही भरणे यांनी सांगितले. या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं भरणे यांनी सांगितलं. राज्यातील ऑगस्ट 2025 मधील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमधील 187 तालुके आणि 654 महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.
Jalgaon News: एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना
त्यात मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, 805,110 हेक्टर म्हणजे तब्बल 20,12,775 एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 10,000 हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र असलेले 11 जिल्हे समोर आले आहेत. सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये नांदेड 2,85,543 हेक्टर, वाशिम 1,64,557 हेक्टर, यवतमाळ 80,969 हेक्टर, बुलढाणा 74,405 हेक्ट, अकोला 43,703 हेक्टर, सोलापूर 41,472 हेक्टर आणि हिंगोली 40,000 हेक्टर या जिल्ह्याचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world