यंदा मे महिन्यातच पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा 12 ते 14 दिवस आधीच पाऊस दाखल झाला. त्यामुळे कांद्यासह अनेक उत्पादनांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पालेभाज्या महागल्या आहेत. येत्या काळात भाज्यांसह शेती उत्पादनाच्या भावात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या मे महिन्यातच पाऊस दाखल झाल्याने जमिनीत एक फुटापर्यंत ओल तयार झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवड कधी करावी यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबत माहिती दिली आहे. 31 मे ते 6 जूनपर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याने या कालावधीत शेती मशागत आणि शेत तयार असेल तर पेरणी, लागवड करण्यास काहीही हरकत नाही असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. 7 जूनपासून पावसाला पोषक वातावरण असल्याने ३० जूनपर्यंत पाऊस वाढतच जाणार असल्याने जूनमध्ये पेरणी होणे चांगलेच राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - EXPLAINER : मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? वाचा A to Z माहिती
मे महिन्यात एवढा पाऊस का?
मे महिन्यातच एवढा पाऊस का पडतोय? दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात मे महिन्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. तर इकडे मुंबईमधल्या पावसाची नोंद तब्बल 85 मिलीमीटर्यंत गेलीय. मुंबईमध्ये 1951 नंतर पहिल्यांदाच म्हणजे गेल्या 75 वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यातलं तापमान 22 अंश इतकं कमी नोंदवलं गेलंय...
मे महिन्यात एवढा धो धो पाऊस का झाला...
- अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र
- अरबी समुद्रात ज्या ज्या वेळी कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं, त्या त्या वेळी पावसाचं प्रमाण वाढतं
- कारण या प्रक्रियेदरम्यान हवा समुद्राच्या पृष्ठभागावर जाते आणि तिथला ओलावा शोषून घेते
- या बाष्पयुक्त हवेला ढग वरती उचलून नेतात आणि पाऊस पडतो..