जाहिरात

Attack On Laxman Hake: मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न, गाडी फोडली

अहिल्यानगरच्या  पाथर्डीजवळ अज्ञात लोकांनी गाडीवर हल्ला केल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

Attack On Laxman Hake: मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न, गाडी फोडली

रेवती हिंगवे प्रतिनिधी:

 Ahilyanagar News Laxman Hake Attack: अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगरच्या  पाथर्डीजवळ अज्ञात लोकांनी गाडीवर हल्ला केल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये हाकेंच्या ताफ्यातील एका गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवळ अज्ञात लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. पुण्याहून अहमदनगरकडे जात असताना हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला, ज्यामध्ये त्यांच्या कारची काच फोडण्यात आली. अचानक अज्ञातांनी हा हल्ला केल्याचा दावा हाके यांनी केला आहे.

पतीनेच पत्नीला पेटवलं? महिला 50 टक्के होरपळली, एकनाथ शिंदेंचा पोलिसांना फोन, अकोल्यात काय घडलं?

ही घटना घडली तेव्हा त्यांच्यासोबत पोलीस ताफा (Police Escort) उपस्थित असतानाही हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com