ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपये ते 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता व्यावसायिक सिलेंडर 1740 रुपयांना मिळणार आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
बदलापूर प्रकरणातील आरोपींना दणका
बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर अत्याचार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. तुषार आपटे आणि उदय कोतवाल असं या ट्रस्टींचं नाव आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने त्यांना यापूर्वीच फरार म्हणून घोषित केले आहे.
जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलक आक्रमक, लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा मराठा आंदोलकांवर आरोप
जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत. ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करत आंदोलन केलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा मराठा आंदोलकांवर आरोप आहे. हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी आंदोलकांकडून हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांचा निषेध नोंदवलाय.
कल्याणमधील ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
कल्याणमधील ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळ हरदास यांच्या जन्मदिनी एका महिलेने घातला होता गोंधळ. दुर्गाडी नवरात्र उत्सवचा बॅनर काढल्याने महिलेने गोंधळ घातला होता. या गोंधळादरम्यान महिलेचा हरदास यांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे. याआधी शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने हरदास यांना धमकावल्याचा आरोप केला होता.
नायर हॉस्पिटल डीन यांची बदली करण्याचे मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश
नायर हॉस्पिटल डीन यांची बदली करण्याचे मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश.
आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानंतर डीन यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू.
रुग्णालयात लैंगिक छळ होत असल्याचा विद्यार्थिनींचा आरोप.
एमबीबीएस विद्यार्थिनींनी केले होते गंभीर आरोप.
मनसे नेता संदीप देशपांडे यांनी प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतली दखल.
राहुल गांधी यांना नाशिक न्यायालयाने बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांना नाशिक न्यायालयाने समन्स बजावलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. 2022 मद्ये हिंगोलीत जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. निर्भय फाउंडेशन तर्फे देवेंद्र भूतडा यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे न्यायायलाचे निरीक्षण.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेते गोविंदा यांची प्रकृतीबाबत विचारपूस
"मी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीने सदिच्छा व्यक्त केल्या.
गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री दिली आहे. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत.
गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयातून लाखो लोकांना आनंद दिला आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहोत."
मोटारसायकलने गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक, गोंदिया पोलिसांची कारवाई
मोटारसायकलने गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत टोयागोंदी येथील तुडमुळी चौकी येथे पकडण्यात आले. सालेकसा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
शिंदे समितीकडून आज धनगर आरक्षणाच्या संदर्भात अहवाल सरकारकडे सुपुर्द करण्यात येणार
शिंदे समितीकडून आज धनगर आरक्षणाच्या संदर्भात अहवाल सरकारकडे सुपुर्द करण्यात येणार.
धनगर आरक्षणाचा अहवाल ओबीसी मंत्रालयाच्या सचिव विनिता सिंघल यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार.
सुधाकर शिंदे यांच्या 9 जणांच्या समितीने 9 महिने 5 राज्यात जाऊन धनगर आरक्षणच्या संदर्भात अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.
आज हा अहवाल शिंदे समितीकडून ओबीसी मंत्रालयाच्या सचिव विनीता सिंघल यांना सुपुर्द करण्यात येणार.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार. राज्यातील महायुती जागावाटप संदर्भात करणार चर्चा. सह्याद्री अतिथीगृह येथे घेणार भेट. देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार. महायुती जागावाटप जवळपास पूर्ण काही मोजक्या जागांवर तिढा. त्यावर अमित शाहांसमोर होणार असल्याची सूत्रांची माहिती.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर बच्चू कडू मोर्चा काढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर बच्चू कडू मोर्चा काढणार आहेत. 4 ऑक्टोबरला अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड घरावर बच्चू कडू मोर्चा काढणार आहेत. मोर्चात राज्यभरातील दिव्यांग सहभागी होणार आहेत. मुंबईतील आंदोलन सोडवताना दिलेलं आश्वासन सत्तारांनी पाळला नसल्याचा आरोप.
बदलापूर अत्याचार घटनेतील फरार आरोपी शाळेच्या ट्रस्टींच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
बदलापूर अत्याचार घटनेतील फरार आरोपी शाळेच्या ट्रस्टींच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
याआधी शाळेच्या ट्रस्टींनी अटकपूर्व जाण्यासाठी दोनदा याचिका केलेली होती, परंतु कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता
न्यायमूर्ती आर्यन नड्डा यांच्या खंडपीठासमोर पार पडणार सुनावणी
बदलापूर अत्याचार प्रकरणात तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने देखील शाळेच्या ट्रस्टींना फरार घोषित केले आहे.
अभिनेता गोविंदा मिसफायर झाल्याने जखमी, पायाला लागली गोळी
अभिनेता गोविंदा मिसफायर झाल्याने जखमी झाला आहे. बंदुक साफ करत असताना ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. गोळी पायाला लागल्याने गोविंदा जखमी झाला आहे.
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत हायटेक कॉपी, एकाला अटक
माईक स्पाय नावाचे हाय टेक ॲप वापरून पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत नक्कल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षेदरम्यान बाहेरून एक व्यक्ती मोबाईल फोनद्वारे परीक्षार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरे सांगत होता. या प्रकरणी आरोपी परीक्षार्थी उमेदवारास अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव किसन जोनवाल असून तो छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे समजते. त्याला उत्तरे सांगणारा साथीदार जीवन काकरवाल याचा शोध सुरू आहे.
राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबरला कोल्हापुरात येणार, शिवरायांच्या पुतळ्याचं करणार अनावरण
शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर गाडी थांबवून एकाची आत्महत्या
शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर गाडी थांबवून एकाची आत्महत्या
घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली
व्यक्तीचा अद्याप शोध सुरू असून कुटुंबीयांची माहिती घेण्याचं काम सुरू
गाडी सुशांत चक्रवर्ती यांची असल्याची माहिती
सोमवारी सकाळी 10 वाजताची घटना अद्यापही शोध मोहीम सुरू