Maharashtra Politics: संजय राऊतांना काळे फासणाऱ्यास 1 लाखांचे बक्षीस, कुणी केली घोषणा? कारण...

संजय राऊत यांच्या तोंडाला काळ फासणाऱ्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देऊ, अशी घोषणा अहिल्यानगरचे शिवसेना शिंदे गटाचे  शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रसाद शिंदे, अहिल्यानगर: शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार  संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरुन शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच संजय राऊत यांच्या तोंडाला काळ फासणाऱ्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देऊ, अशी घोषणा अहिल्यानगरचे शिवसेना शिंदे गटाचे  शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या वक्ताव्यावरून अहिल्यानगरला दिल्ली गेट येथे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले आहे. तसेच संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासेल त्यास एक लाख रुपये बक्षीस यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव यांनी जाहीर केले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्याने खरं म्हणजे महाकुंभमेळ्यात जाऊन नागा साधू बरोबर जाऊन बसायला पाहिजे होत, नागा साधूही फार अस्वस्थ असतो असे वक्तव्य केले होते. असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध करत अहिल्यानगर शहरात शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

शहरातील दिल्लीगेट येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम खासदार संजय राऊत यांनी केले आहे. खासदार संजय राऊत यांच्या या कृतीचा निषेध म्हणून जो कोणी खा.संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासेल त्यास एक लाख रुपये बक्षीस यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Exclusive : "अशी भांडणं आम्ही शाळेत लावायचो", वडेट्टीवार-राऊतांच्या आरोपांना उदय सामंतांचं उत्तर