उद्धव ठाकरे यांना संपवून शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपवून नवीन 'उदय' पुढे येईल, असं वक्तव्य काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला होता. या सर्व आरोपांना मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. उदय सामंत यांनी दावोसमधून 'एनडीटीव्ही मराठी'शी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
उदय सामंत यांनी म्हटलं की, "विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व द्यावे असं मला वाटत नाही. त्यांनी केलेला हा जगातील सर्वात मोठा जोक आहे. संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका राजकीय बालिशपणा आहे. मी एकनाथ शिंदे यांचा सहकारी म्हणून काम करतो. काही लोकांच्या डोळ्यात हे खुपतं, त्यातील या दोन व्यक्ती असू शकतात."
(नक्की वाचा- "शिंदेंची गरज संपली, आता नवीन 'उदय' पुढे येईल"; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य)
विजय वडेट्टीवार फडणवीसांना भेटले
"विजय वडेट्टीवर मागील सहा महिन्यात दोन-चार वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचीही चर्चा आहे. संजय राऊतांबाबत देखील चर्चा आहे की उठावाच्या मागे त्यांचा देखील हात होता. त्यामुळे मला वाटतं की या बालिशपणाला मी किंमत देत नाही. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणाच्या पलिकडचे आहे. त्यांना ज्या ज्या वेळी सहकाही म्हणून मदत लागेत ते आयुष्यभर देण्यासाठीच मी त्यांच्यासोबत आहे", असं उदय सामंत यांनी म्हटलं.
विजय वडेट्टीवार भाजपच्या संपर्कात आहेत. नाना पटोलेंच्या विरोधात त्यांनी षडयंत्र आखलं. त्यांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची तक्रार राहुल गांधींकडे केली. त्यामुळे त्यांना माझ्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे का? त्यांनी निष्ठेच्या गोष्टी मला शिकवू नयेत, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.
(नक्की वाचा- Guardian Minister: पालकमंत्र्यांना काय अधिकार असतात? इतकं महत्त्वाचं का असतं हे पद?)
अशी भांडणे आम्ही शाळेत लावायचो
"संजय राऊतांना देखील मला सूचना करायची आहे, अशा पद्धतीने माझे आणि शिंदे साहेबांचे संबंध बिघडतील. आमच्यामध्ये काही गैरसमज होतील, असं वाटत असेल तर ते शक्य नाही. अशी भांडणे आम्ही शाळेत लावायचो. महाराष्ट्रातील जनता या बालिश राजकारणाला किंमत देणार नाही. उदय सामंत सर्वसामान्य कुटुंबातून येतो म्हणून त्रास द्यायचा, ही काही लोकांची भूमिका असू शकते. माझ्यासोबत 20 आमदार आहेत, हा या वर्षातला सर्वात मोठा जोक आहे. माझा संबंध नसताना त्या घडवण्याचा प्रयत्न काहीजण करत असतील तर नियती यांना माफ करणार नाही", असंही उदय सामंत यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world