Beed News : "...आता सहनशीलता संपली", अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान शिक्षक ढसढसा रडला

Beed News : बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 9 दिवसांपासून शिक्षक आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

विनोद जिरे, बीड

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान बीडमधील विनाअनुदानित शाहू-फुले-आंबेडकर अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा आंदोलक शिक्षक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक आक्रमक झाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विनाअनुदानित निवासी आश्रमशाळेवरील शिक्षक मागील 9 दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत.  अजित पवारांना भेटण्याची आंदोलक शिक्षकांची मागणी होती. मात्र अजित पवारांनी आंदोलक शिक्षकांची भेट न घेतल्याने शिक्षक आक्रमक आंदोलक शिक्षकांनी 'अजितदादा भेट द्या' म्हणत प्रचंड घोषणाबाजी केली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड अहमदनगर महामार्ग देखील काही वेळ अडवला.

(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)

यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपली व्यथा मांडली. एका शिक्षकाला आपली परिस्थिती सांगताना अश्रू अनावर झाले. "अजित पवारांनी भेट घेतली नाही. नऊ दिवसापासून आमचं आंदोलन सुरु आहे.  मात्र अद्याप कुणीही भेट दिली नाही. शिक्षक असूनही रिक्षा चालवतो.  मात्र आता सहनशीलता संपली. आम्हाला न्याय द्या", असं म्हणत शिक्षक ढसाढसा रडला. यावेळी पोलीस प्रशासनाने शिक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

(नक्की वाचा-  Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकाला मंजुरी मिळणार का? लोकसभेतील गणित कसं असेल?)

मागील 9 दिवसांपासून शिक्षक आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या आंदोलनाकडे प्रशासनाने देखील दुर्लक्ष केले आहे. 

Advertisement

विनाअनुदानित शाळेचे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत जीवन संपवलं होतं. आपली व्यथा त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये मांडली होती. त्यावेळी अवघा महाराष्ट्र हळहळला होता. त्यानंतर शिक्षकांच्या वतीने 25 मार्च रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.

Topics mentioned in this article