- अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुःखद निधन झाले असून त्यांचे अंत्यसंस्कार बारामतीत शासकीय इतमामात होतील
- बारामतीमध्ये त्यांनी विकासाचे मॉडेल तयार केले आणि जनतेसाठी जनता दरबार सुरू केला
- अजित पवार हे पुणे जिल्ह्याच्या मायक्रो मॅनेजमेंटसाठी आणि बारामतीतील रस्ते व सिंचन प्रकल्पांसाठी ओळखले जात होते
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणजे अजित पवार. त्यांचे बुधवारी विमान अपघातात दुःखद निधन झाले. ज्या बारामतीला त्यांनी विकासाचे मॉडेल बनवले, त्याच मातीत गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 'दादा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याच्या शब्दाला बारामतीमध्ये सरकार इतकाच मान होता. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ते जनता दरबार घेत होते त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
"अजित दादांचे शब्द म्हणजे बारामतीचे शासन" हे समीकरण आता इतिहास जमा झाले आहे. बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघाताने बारामतीचा सुपुत्र हिरावून नेला. गुरुवारी लाडक्या 'दादां'चे अंतिम संस्कार बारामतीत पार पडणार आहेत. पहाटे 06 वाजल्यापासून जनसेवेसाठी दरबार भरवणारा हा लोकनेता आता कायमचा शांत झाला आहे. जनता ही त्यांचा श्वास होती. त्यांची ती ताकद होती. जनतेसाठी काही ही असा हा नेता होता. जर कुणी काम आणलं तर ते झालचं पाहीजे अशी त्यांची धारणा होती.
प्रशासकीय पकड आणि विकासाचा ध्यास असलेला हा नेता होता. अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर बारामतीच्या विकासाचे एक रोल मॉडेल होते. शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात आपले चार हात दाखवले. तर त्याच वेळी अजित पवारांनी महाराष्ट्रात पक्षाला ताकद दिली. पुणे जिल्ह्याचे 'मायक्रो मॅनेजमेंट' आणि बारामतीमधील रस्ते, सिंचन प्रकल्प तसेच शैक्षणिक संस्थांचे जाळे हे त्यांच्याच प्रशासकीय कौशल्याचे फळ आहे. कामाने झपाटलेला माणूस अशी त्यांची एक प्रतिमा होती.
नक्की वाचा - Ajit Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे काय होणार?, 'या' आहेत 5 शक्यता
पहाटे 06 वाजल्यापासून त्यांचा जनता दरबार सुरू व्हायचा, जिथे सामान्य जनतेचे प्रश्न त्वरित सुटायचे. त्यांच्या निधनाने ग्राउंड झिरोवर काम करणारा एक मोठा लोकनेता हरपला आहे. अजित पवार यांच्या या कार्यशैलीची चर्चा नेहमीच मंत्रालयापासून ते गावातील चावडीपर्यंत होत असे. पहाटे 06 वाजता कामाला सुरुवात करणाऱ्या दादांनी बारामतीला विकासाचे मॉडेल बनवले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे जिल्ह्याची सूत्रे समर्थपणे सांभाळली होती. गुरुवारी शासकीय इतमामात त्यांना निरोप दिला जाईल. तो ही त्याच जागी ज्या ठिकाणी ते जनतेचे प्रश्न सोडवत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world