जाहिरात

Ajit Pawar Death: वरिष्ठ नेत्यांचीही तीच मागणी, माझा लढा कायम राहील; अमोल मिटकरी तो दावा फेटाळून लावला

Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर सध्या आक्रमक भूमिकेत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी ते वारंवार करत आहेत.

Ajit Pawar Death: वरिष्ठ नेत्यांचीही तीच मागणी, माझा लढा कायम राहील; अमोल मिटकरी तो दावा फेटाळून लावला
"Ajit Pawar Death: अमोल मिटकरींनी तो दावा फेटाळून लावला"
Amol MitkarI X And PTI

Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आहेत. अजित पवार यांच्या घातपाताचा संशय ते वारंवार व्यक्त करताना दिसत आहेत. आमदार अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे पाटील आणि सुरज चव्हाण हे सातत्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत.त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची फळी नाराज असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली होती. पण अमोल मिटकरी यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय. 

माझा लढा कायम राहील: अमोल मिटकरी

आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी मी आदरणीय दादांच्या घातपाताचा संशय व्यक्त केल्याने नाराज असल्याची पेड न्यूज़ जाणीवपूर्वक चालवल्या गेली आहे. वरिष्ठ नेत्यानी सुद्धा हीच मागणी केली आहे त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या कठीण काळात एकसंघच आहे. मला हा प्रश्न का विचारलाय असा कुणी फोनकरून नाराजी व्यक्त केलेली नाही. सत्य प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. माझ्या नावाने पेड न्यूज पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मी कोणावरही बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. माझी भूमिका स्पष्ट, पारदर्शक आणि जनतेसमोर आहे. अफवा पसरवणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल.दादांच्या अकाली जाण्याची सत्यता जनतेसमोर आलीच पाहिजे त्यासाठी माझा लढा कायम राहील आणि माझा पक्ष व पक्षातील वरिष्ठ फळीतील नेते माझ्या पाठीशी राहतील याबाबत माझ्या मनात दुमत नाही.

(नक्की वाचा: Ajit Pawar Death: रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, आक्रमक भूमिकेस सुनेत्रा पवारांची सहमती? सूत्रांची मोठी माहिती)

#हम पागल ही अच्छे है: अमोल मिटकरी

"काही जण म्हणताहेत दे सोडून हा विषय पण मला प्रश्न इतकाच पडतोय ज्यांनी या पुरोगामी महाराष्ट्रासाठी व शिव शाहु फुले आंबेडकर विचारधारेसाठी आयुष्यभर लढा दिला,ज्या नेत्याने कधी जातीवर मत मागितली नाहीत त्यांच्या जाण्याबाबत शांत राहण नैतिकतेला शोभेल का? सत्य काहीही असो,ते स्पष्ट आणी विश्वासार्ह पद्धतीने समोर आले पाहिजे.कारण शंका जेवढ्या वाढतात,तितकी वेदना वाढते.#हम पागल ही अच्छे है" अशाही भावना त्यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर व्यक्त केलीय. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Death News: अमोल मिटकरींचा नवा खळबळजनक दावा, आता थेट मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र; पत्रात काय दडलंय?)50 कोटी रुपयांच्या विम्याचा दावा

अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं होतं की, "VSR कंपनीने डिसेंबर 2025 च्या महिन्यात आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलट चा 50 कोटी रुपयाचा विमा उतरविल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती ऐकण्यात येतेय". त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली होती. तसेच इतक्या भीषण विमान अपघातामध्ये कागदपत्रं का जळली नाहीत? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलो होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com