- सागर कुलकर्णी, प्रतिनिधी
Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar News) यांच्या विमान अपघातावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणावरून आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने खळबळजनक आरोप करत आहेत. दुसरीकडे अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्यांनी विशेषतः सुनेत्रा पवार यांनी बाळगलेलं मौन आता चर्चेचा केंद्रबिदू ठरत आहे. त्यांच्या या मौनामागे नेमकं काय दडलंय? यावरून पक्षांतर्गत वेगळीच चर्चा रंगलीय.
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा आणि संशयाची सुई | Rohit Pawar News
अजित पवार (Rohit Pawar Death News) यांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून तो एक घातपात असल्याचा संशय रोहित पवार वारंवार व्यक्त करताना दिसत आहेत. रोहित पवारांनी (Rohit Pawar) या प्रकरणात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे विमान अपघाताच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी "अपघातावरून राजकारण करू नका, घातपात नाही, हा निव्वळ अपघात" असे विधान केलेले असतानाही रोहित पवार 10 फेब्रुवारीपासून दररोज वेगवेगळे मुद्दे मांडून खळबळ उडवून देत आहेत.
(नक्की वाचा: Ajit Pawar Death: अजितदादांचा विमान प्रवास, फाइल कनेक्शन, अन् प्रफुल पटेलांचा उल्लेख; प्रमोद हिंदुरावांचा धक्कादायक गौप्यस्फोट)
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचे मौन कोणासाठी?
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भूमिका. रोहित पवार दररोज अजित पवारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असताना सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांनी त्यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांच्याकडून वेगवेगळे दावे, संशय व्यक्त केले जात असताना सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याने पक्षात वेगळीच चर्चा रंगली आहे. "सुनेत्रा पवार यांची रोहित पवारांच्या भूमिकेस सहमती आहे का? यासह अनके प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
(नक्की वाचा: Ajit Pawar Death News: अमोल मिटकरींचा नवा खळबळजनक दावा, आता थेट मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र; पत्रात काय दडलंय?)
विरोधी पक्षातील नेतेमंडळी देखील रोहित पवारांच्या प्रश्नांना उत्तर मिळायला हवे, असे म्हणत असताना आता सुनेत्रा पवार आपली भूमिका कधी मांडणार? की हे मौन भविष्यातील एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत आहेत? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world