Ajit Pawar Death: DGCAने वेळ का दिला नाही? रोहित पवारांचा खळबळजनक प्रश्न; आता चेंडू अमित शाहांच्या कोर्टात?

Ajit Pawar Death: रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. DGCAने वेळ का दिला नाही? असा थेट प्रश्नही त्यांनी विचारलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ajit Pawar Death: रोहित पवार यांनी पुन्हा उपस्थितीत केले धक्कादायक प्रश्न"
PTI

Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक शंका उपस्थित केल्या आहेत. या अपघातामागील सत्य शोधण्यासाठी रोहित पवारांनी थेट दिल्ली गाठली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू आणि DGCAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र ही भेट होऊ शकली नाही. अखेर रोहित पवारांनी (Rohit Pawar News) या अपघाताशी संबंधित सर्व संशयास्पद तथ्य आणि एक सविस्तर प्रेझेंटेशन ई-मेलद्वारे केंद्र सरकारला पाठवले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तपासाच्या वेगाबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलंय की, "अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून तथ्यांसह या शंका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपुढे मांडल्या. याच विषयावर गृहमंत्री अमित शाह साहेब, नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू जी तसेच DGCA ची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट होऊ शकली नाही. त्यामुळं प्रेझेंटेशनसह आमच्या सर्व शंका गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA यांना ई-मेल पाठवून या अपघाताबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती केली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या अनेक प्रश्नांची वस्तुनिष्ठ उकल होईल, असा विश्वास आहे.

(नक्की वाचा: Ajit Pawar Death: वरिष्ठ नेत्यांचीही तीच मागणी, माझा लढा कायम राहील; अमोल मिटकरी तो दावा फेटाळून लावला)

पत्रकार परिषद घेतल्यानंतर तपासाला काही प्रमाणात वेग आला असला तरी अद्यापही अपेक्षित वेगाने तपास मात्र होताना दिसत नाही. माननीय गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे वेळ देता आला नसेल परंतु DGCAने वेळ का दिला नाही, हे मात्र समजले नाही. यंत्रणांनी वेळ दिला नसला तरी सर्व माहिती यंत्रणाकडे पाठवली आहे, सत्तेत नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करतच आहोत, राज्य सरकार आणि सत्तेतील सर्वचजण देखील यासाठी पाठपुरावा करतील, ही अपेक्षा..!"

Advertisement

(नक्की वाचा: Ajit Pawar Death: रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, आक्रमक भूमिकेस सुनेत्रा पवारांची सहमती? सूत्रांची मोठी माहिती)

दुसरीकडे VSR कंपनीविरोधात कारवाई करून देशातील सेवेवर बंदी घालण्याची मागणीही रोहित पवारांनी केलीय.