Ajit Pawar Funeral All Updates: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोक पसरला आहे. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या रॅलीसाठी मुंबईतून बारामतीला निघाले होते. त्यादरम्यान बारामतीत लँड करण्यापूर्वी विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते क्रॅश झालं. यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यातील सर्व नेते बारामतीला रवाना झाले. अजित पवारांची अकाली एग्झिट हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. सायंकाळ होईपर्यंत बारामतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नातेवाईकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात गुरुवारी अजित पवारांवर अंत्यसंस्कार होईल. या मैदानात आतापासूनच हजारो कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली आहे.
बारामती में कल अजित पवार का अंतिम संस्कार किया जाएगा. अंतिम संस्कार से पहले बारामती की जनता रात को ही मैदान में जमा होने लगी है #AjitPawar pic.twitter.com/hBD9ErmuY3
— NDTV India (@ndtvindia) January 28, 2026
अजित पवारांवर अंत्यसंस्कार कधी होणार?
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. येथे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमा जाली आहे. मोठ्या संख्येने लोक येत अजित दादांना श्रद्धांजली वाहत आहेत. गुरुवारी अजित दादांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय आमि राज्यस्तरीय नेता उपस्थित राहणार आहेत.

गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात...
अजित पवार यांच्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी बारामतीत अंत्यसंस्कार होतील. त्यांची अंत्ययात्रा सकाळी ९ वाजता सुरू होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण गुजर यांनी सांगितलं की, त्यांचे पार्थिव रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठान मैदानावर जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल. २९ जानेवारीला सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा सुरू होईल आणि मुख्य मैदानावर जाईल.

राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर
गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत दाखल झाले. त्यांनी २८ जानेवारी रोजी राज्यातील शाळेला सुट्टी आणि तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. पवार यांचे अंत्यसंस्कार गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामतीत होतील. अजित यांचे काका शरद पवार, पत्नी सुनेत्रा, दोन्ही मुले आणि बहीण सुप्रिया सुळे हे देखील बारामतीत पोहोचले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world