लक्ष्मण सोळुंके, जालना
राज्यातील लोकप्रिय 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना बंद होणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. लाडकी बहीण योजणेच्या लाभार्थी महिलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अटी-शर्थींचं उल्लंघन केलेल्या महिलांना या योजनेतून वगळलं जात आहे. अशात लाडकी बहीण योजना बंद होणार, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विरोधकांच्या दाव्यांवर अजित पवार यांनी म्हटलं की, "विरोधक म्हणतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. मात्र कोणती योजना बंद होणार कोणती सुरू राहणार हे सरकार ठरवेल ना. तुम्हाला याचे अधिकार कुणी दिली?", असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar Crime: पार्किंगमुळे प्रेम जुळलं, पण शेवट भयंकर! प्रियकराने नर्सला शेतात नेलं अन्...)
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता या महिन्याच्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. "या महिन्याचा हफ्ता येत्या आठ दिवसात वितरित केला जाईल. पात्र महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील. चेकवर सही केली आहे", अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
(नक्की वाचा - CIDCO Lottery: सिडकोची लॉटरी ऐन वेळी रद्द का झाली? मोठं कारण आलं समोर, आता नवी तारीख)
कोणत्या महिलांना या योजनेतून वगळलं?
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ घेत असलेल्या जवळपास 2 लाख 30, 000 महिला या लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. शिवाय ज्या महिलांचे वय 65 पेक्षा जास्त आहे अशा तब्बल 1,10,000 महिला अपात्र ठरल्या आहे.
त्याच बरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या 1,60,000 इतकी आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 5 लाख महिला या लाडकी बहिण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.