जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar Crime: पार्किंगमुळे प्रेम जुळलं, पण शेवट भयंकर! प्रियकराने नर्सला शेतात नेलं अन्...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरानेच निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: पार्किंगमुळे प्रेम जुळलं, पण शेवट भयंकर!  प्रियकराने नर्सला शेतात नेलं अन्...

मोसीन शेख, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. प्रियकराने महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात काम करत असलेल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली आणि  तिचा मृतदेह शेतात पुरल्याची घटना समोर आली आहे. या भयंकर हत्येने शहरात एकच खळबळ उडाली असून आरोपी पशेख इरफान शेख पाशाला ताब्यात घेतलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरानेच निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. मोनिका सुमित निर्मळ असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर  पशेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

मोनिका निर्मळ ही जालना येथे राहत होती. दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये -जा करत होती. रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे, याच पार्किंग वर काम करीत असलेल्या शेख याच्यासोबत तिचे सुत जुळले. गेल्या वर्षभरापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते.

(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)

मात्र 6 फेब्रुवारी रोजी या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट झाला. 6 फेब्रुवारीला प्रियकर पशेख इरफान शेख पाशा याने प्रेयसी मोनिकाला लासुर स्टेशन येथील आपल्या शेतात नेले. तिथे तिची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरला. 6 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आली नाही, त्यामुळे आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, पोलिसांनी तपासचक्र फिरवली असता आरोपी शेखने त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचे समोर आले. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून याप्रकरणी जालना पोलीस पुढील तपास करीत आहेत. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.