Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत 28 फेब्रुवारी रोजी एएआयबीने (AAIB) सादर केलेल्या प्राथमिक अहवालावर जय पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत, असे म्हणत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केलाय.
जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये काय म्हटलंय?
जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, "एएआयबीने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांना केवळ औपचारिक माहिती नव्हे, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वकष उत्तरे मिळाली पाहिजेत. DCGAने ज्या मुद्द्यांवर VSR Venturesची काही विमाने ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर सुरक्षसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास VSRच्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही DCGAने विचार करण्यात यावा."
प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
DGCA ने सुरक्षेच्या कारणास्तव VSR Ventures ची काही विमानांवर बंदी घातली आहे. याच मुद्याचा आधार घेत जय पवार यांनी असा सवाल उपस्थित केला की, जर काही विमानांमध्ये त्रुटी असतील, तर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.
(नक्की वाचा: Ajit Pawar: VSRच्या मालकाचं विमानातील धक्कादायक कृत्य, जय पवारांनी जीवघेण्या निष्काळजीपणाचा Videoच आणला समोर)
संपूर्ण फ्लीट बंद करण्याची मागणी
दरम्यान जय पवार यांनी VSRचे मालक रोहित सिंह यांचाही धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
VSRचे मालक रोहित सिंह यांचा धक्कादायक व्हिडीओ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world