योगेश शिरसाट
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी (Akola Municipal Corporation Election) काँग्रेससोबत युती व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) प्रयत्नशील होती. मात्र काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव न आल्याने वंचित बहुजन आघाडीने (Prakash Ambedkar Political Party) आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी कोणत्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद चांगली असून, उमेदवारांची नावे जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.
नक्की वाचा: Raj-Uddhav Thackeray alliance: राज-उद्धव यांच्या युतीमध्ये कोण-कोण असणार? उद्धव ठाकरेंनी सांगितलं....
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असणार?
वंचित बहुजन आघाडीने अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये 5 नावांचा समावेश आहे. पहिल्या यादीत तीन बौद्ध व दोन मुस्लिम उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली पहिली यादी अशा प्रकारे आहे.
- प्रभाग क्रमांक 7अ - किरण डोंगरे
- प्रभाग क्रमांक 7ड -महेंद्र डोंगरे
- प्रभाग क्रमांक 9अ - चंदू शिरसाट
- प्रभाग क्रमांक 9ब - नाज परवीन शेख वसीम
- प्रभाग क्रमांक 9क -शामिम परवीन कलीम खान पठाण
काँग्रेससोबतची बोलणी फिस्कटली
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकांसाठी युती व्हावी यासाठी मुंबईमध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठका झाल्या होत्या, मात्र या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. राज्यातील नगर पालिका निवडणुकांनंतर या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र नेमकी माशी कुठे शिंकली हे कळू शकले नाही. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबतच्या आघाडीबद्दल बोलताना मंगळवारी (23 डिसेंबर) म्हटले की, 'काँग्रेसने आपला जुना खेळ पुन्हा सुरू केलाय. लोकांमध्ये जे बोलता त्याविरुद्ध ते वागतात. आम्ही कोणाकडेही गेलो नाहीत. ते आमच्याकडे आले. आमच्याकडे मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना हे स्थानिक पातळीवर आमच्या लोकांकडे युतीसाठी आले. स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार आमच्या जिल्हा कमिटीला दिले आहेत. राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि भाजप हे दोनच पक्ष महानगरपालिका निवडणुकीत 50-50 टक्के उमेदवार उभे करू शकतात. ज्या ठिकाणी युतीत काँग्रेस नीट नाही वागली, तर आम्ही ते उडवून लावले आहे.
नक्की वाचा: लव्ह जिहादचा मोठा खुलासा, हिंदू मुलीशी लग्न केल्यास 10 लाखांचं बक्षीस; मुस्लीम पत्नीने पतीची केली पोलखोल
अकोला मानगरपालिकेत 2017 साली कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या होत्या?
2017 च्या निकालांवर नजर टाकल्यास, भाजपला 48, काँग्रेसला 13, शिवसेनेला 08, तर राष्ट्रवादीला 05 जागांवर समाधान मानावे लागले होते. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने (तत्कालीन भारिप) 03 जागा मिळवल्या होत्या, तर एमआयएमचा 1 नगरसेवक निवडून आला होता. दोन अपक्ष उमेदवारांनीही बाजी मारली होती. भाजपच्या या 5 वर्षांच्या कार्यकाळात पहिले 2.5 वर्षे विजय अग्रवाल यांनी महापौरपद भूषवले, तर उर्वरित 2.5 वर्षांसाठी अर्चना जयंता मसने यांनी शहराच्या कारभाराची धुरा सांभाळली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world