जाहिरात

Akola News : घराचं बांधकाम सुरू असताना 15 मजुरांना विजेचा झटका, एकाचा मृत्यू

अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे वडगाव रोठे येथे ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Akola News : घराचं बांधकाम सुरू असताना 15 मजुरांना विजेचा झटका, एकाचा मृत्यू

योगेश शिरसाट, अकोला

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे येथे मंगळवारी सायंकाळी 7 वाजता वसंता बरिंगे यांच्या घराच्या बांधकामस्थळी मोठी दुर्घटना घडली आहे. सेंट्रिंगचे काम करत असलेल्या 14 ते 15 तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. या दुर्घटनेत 17 वर्षीय बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी (ता. संग्रामपूर) येथील ओमप्रकाश केशवराव जांभळे या अल्पवयीन कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तो इतर मजुरांसोबत घराच्या स्लॅब टाकण्याच्या कामासाठी आला होता.

यादरम्यान, एका घरावर स्लॅब टाकण्याचे काम आटपून मिक्सर मशीन बाजूला घेत असताना मिक्सरच्या गाडीचा विद्युत ताराला स्पर्श झाला, त्यामुळे मोठा अनर्थ घडला. यावेळी बाकीच्यांना मिक्सरपासून लांब करण्यात आलं. मात्र अल्पवयीन ओमप्रकाश जांभळे याच्याकडे लक्ष न दिल्याने त्याला विद्युत ताराच्या प्रवाहाचा जोरदार झटका बसला. त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

C. Sambhajinagar:माजी आमदाराच्या पुतण्याची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये व्यवहारांची आकडेमोड आढळल्याने खळबळ

नक्की वाचा - C. Sambhajinagar:माजी आमदाराच्या पुतण्याची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये व्यवहारांची आकडेमोड आढळल्याने खळबळ

या घटनेत आठ कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. सर्व कामगार हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रिंगचा साचा उचलताना तो वीजवाहक तारेला लागल्याने विजेचा शॉक बसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर बांधकाम ठेकेदार घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे वडगाव रोठे येथे ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com