
Akola News : अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय तरुणाच्या गुदद्वारात सुमारे 30 सेंटीमीटर (अंदाजे 11.81 इंच) लांबीचा प्लास्टिक पाईप अडकण्याची घटना समोर आली आहे. ही घटना समजताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
नेमकी कशी घडली घटना..!
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या राहत्या घरी असताना अचानक पलंगावरून पडला आणि त्या पडण्याच्या घटनेदरम्यान घरात पडलेला प्लास्टिक पाईप त्याच्या गुदद्वारात अडकला, (2-foot plastic pipe stuck in young man's anus) असा दावा नातेवाईकांनी केला आहे. मात्र हा प्रकार नक्की कसा घडला, याबाबत अजूनही अनेक शंका उपस्थित असून घटनेनंतर तरुणाला तीव्र वेदना होत होत्या आणि शौचास जाणेही अशक्य झाले होते. त्यामुळे बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी तरुणाला वेदना असह्य होत असल्याने कुटुंबीयांनी त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर एक्स-रे आणि इतर चाचण्या करून पाईप गुदद्वारात खोलवर अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता, डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
नक्की वाचा - Virar Building Collapse : विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 15 जण दगावले, अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू
यादरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर रवी खंडारे यांच्या कडून सांगितलं नुसार आणि शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 10च्या सुमारास शस्त्रक्रिया पार पडली आणि सुमारे 30 सेंटीमीटर लांबीचा प्लास्टिक पाईप सुरक्षितपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. या प्रक्रियेदरम्यान तरुणाच्या गुदद्वाराच्या ठिकाणी मोठी जखम झाल्याचे निदर्शनास आले असून त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात असून संक्रमण किंवा अन्य गुंतागुंत होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. स्थानिक डॉक्टरांनीही ही घटना गंभीरपणे घेतली असून अशा घटनांपासून इतरांनीही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही घटना समोर येताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं असून अशा प्रकारच्या घटनांमागे खरी कारणं काय असू शकतात, यावर देखील विविध चर्चा रंगल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world