जाहिरात

Akola News : दिवसभर कष्टाचे काम करुन परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; अकोल्यात वाहन उलटून भीषण अपघात

Akola News : एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस वेचणीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटल्याने हा अपघात झाला.

Akola News : दिवसभर कष्टाचे काम करुन परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला;  अकोल्यात वाहन उलटून भीषण अपघात
Akola News :  अपघात इतका भीषण होता की वाहनातील काही मजूर थेट रस्त्यावर फेकले गेले.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला 

Akola News :  अकोला जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली असून मध्य प्रदेश येथील मजुरांचा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. कपिलेश्वर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस वेचणीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटल्याने या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री सुमारे 7.30 वाजताच्या सुमारास खरप बुद्रुक ते घुसरनजीक घडली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, अकोला शिवारात कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेशातील बन्हाणपूर येथील मूळ रहिवासी असलेले मजूर आले होते. सध्या या मजुरांचे वास्तव्य आपातापा परिसरात होते.

कसा झाला अपघात?

दिवसभर कष्टाचे काम आटोपून शनिवारी सायंकाळी 7.30  वाजताच्या सुमारास सर्व मजूर एका वाहनाने आपल्या निवासस्थानी परतत होते. रात्रीच्या सुमारास खराब बुद्रुक ते घुसर रस्त्यावर विद्युत कंपनीच्या पॉवर हाऊससमोर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघात इतका भीषण होता की वाहनातील काही मजूर थेट रस्त्यावर फेकले गेले. या दुर्घटनेत मुन्नीबाई जांभेकर (वय 45) आणि मनिष कासदेकर (वय 37) यांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित 11 मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील 3 अल्पवयीन मुलं शेगावला निघाले आणि मुंबईच्या ट्रेनमध्ये सापडले! वाचा कसा लागला शोध? )

पोलिसांना काय संशय?

घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक पराग गवई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तसेच 108 रुग्णवाहिकेने वेळेवर घटनास्थळी पोहोचून जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांना मृत घोषित केले असून जखमींवर तातडीचे उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अकोट फैल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहन बाजूला काढण्याची कारवाई केली आहे. प्राथमिक तपासात वाहनाचा वेग अधिक असल्याने अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी पुढील तपास अकोट फैल पोलीस करीत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com