
राहुल कुलकर्णी, पुणे: राज्यात सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या तसेच हुंडाबळी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. वैष्णवी मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपी असलेले हगवणे पिता- पुत्रांचे नवनवे कारनामे आता समोर येत आहेत. याच हगवणे बंधुंनी खोटी कागदपत्रे दाखवून शस्त्रपरवाना मिळवल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर एनडीटीव्ही मराठीने पुण्यातील शस्त्र परवान्यांबाबत सवाल उपस्थित केले होते. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले की पुणे पोलिसांनी मागील काळात दिलेले सर्व शस्त्र परवाने आता पुनरावलोकनाच्या प्रक्रियेत जातील. नोव्हेंबर 2022 मध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी अटक झालेल्या हगवणे बंधूंना दिलेले शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून हा निर्णय अटी व शर्तींचे उल्लंघन आणि गैरप्रकाराच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बंदूका परवाना वाटप केल्याप्रकरणी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांनी नियम मोडल्याचीही चर्चा होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे हगवणे कुटुंबातील सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांचाही बंदूक परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना बंदूक परवाना देणाऱ्या जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलेश चव्हाण या आणखी एका आरोपीच्या परवान्याबाबतही अशाच प्रकारे कारवाई केली जाईल. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पडेल, असे आश्वासन दिले आहे.
( नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )
धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात 6 हजार 871 जणांकडे बंदूका आहेत. त्यात 35 महिला असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रपरवाने कोणत्या आधारे दिले गेले. तक्रार नोंदवल्यावरच पोलीस जागे का होतात?
खरंच परवाना यंत्रणा इतकी कमजोर आहे? असे सवाल आता उपस्थित आहेत.
दरम्यान, पुणे शहरात 2024 मध्ये फक्त 65 नवीन परवाने दिले गेले. पण याच वर्षात तब्बल 111 परवाने रद्द झाले आणि 200 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या! जर परिस्थिती इतकी गंभीर आहे, तर हे निलेश चव्हाण आणि हगवाणेंचे मुलगे अजूनही कसे मोकाट फिरू शकतात? पुणे शहरात अजूनही जवळपास 6,300 परवानाधारक आहेत. यापैकी किती जण खरंच कायद्याचं पालन करतात? हा केवळ गुन्हेगारीचा प्रश्न नाही, तर ही आपल्या परवाना देण्याच्या यंत्रणेची लाजिरवाणी बाब आहे.
Akola Crime: कृषी अधिकाऱ्यांची मोठी कारवाई! लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्त
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world