
निनाद करमारकर, ठाणे: अंबरनाथमध्ये उल्हास नदीतून एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा खंडित झालाय. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय. मात्र यामुळे पुढील २४ तास एमआयडीसीकडून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथच्या जांभूळ गावात एमआयडीसीचं बारवी जलशुद्धीकरण केंद्र आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात उल्हास नदीतून पाणी उपसा करून आणला जातो आणि जलशुद्धीकरण करून ते पाणी अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, आनंदनगर एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी या भागाला पुरवलं जाते.
मात्र नदीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणारी 40 वर्ष जुनी जलवाहिनी फुटल्याने जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीला 24 तास लागणार असून तोपर्यंत बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, आनंदनगर एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी या संपूर्ण भागाचा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे.
नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world