बच्चू कडूंच्या प्रहारचा आमदार शिवसेनेच्या गळाला; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र बच्चू कडू यांच्या मनसुब्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती

बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीआधी मोठा धक्का बसला आहे.प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. राजकुमार पटेल शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 10 ऑक्टोबर पटेल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 ऑक्टोबरला धारणीला येणार आहेत. त्यांच्या उपस्थित मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे, अशी माहिती आमदार राजकुमार पटेल यांनी दिली आहे. धारणी येथे आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्ता मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली. 

(नक्की वाचा - डोंबिवलीत ट्वीस्ट! शिंदेंचा मोहरा ठाकरेंच्या गळाला, भाजपचे टेन्शन वाढले?)

दोन दिवसांपूर्वीच आमदार राजकुमार पटेल यांच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या पोस्टर समोर आलं होतं. या पोस्टरवरुन ते पक्ष सोडतील अशी चर्चा सुरु होती. बच्चू कडू यांचा फोटो राजकुमार पटेल यांच्या पोस्टरवरुन गायब होता. बच्चू कडू यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो होता. त्यानंतर याच कार्यकर्ता मेळाव्यात राजकुमार पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

(नक्की वाचा -  अजित पवारांना आणखी एक झटका लागणार? बडा नेता घर वापसीच्या तयारीत)

विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र बच्चू कडू यांच्या मनसुब्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Topics mentioned in this article