
निलेश बंगाले, वर्धा
Wardha News : बऱ्याचदा नागरिक आपल्या समस्या घेऊन संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडे जात असतात. मात्र त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने नागरिक हतबल होतात. एकेकाळी आपल्याकडे मत मागण्यासाठी आलेले लोकप्रतिनिधी पाच वर्षे आपल्याकडे पाठ फिरवतात, त्यामुळे मत देऊन आपण चूक केली की काय अशी भावना मतदाराच्या मनात निर्माण होते.
मात्र वर्ध्यात याच्या उलट घडतंय. वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघापैकी आर्वी मतदारसंघात चक्क आमदारच नागरिकांच्या घरोघरी जात तुम्हाला काही समस्या आहे का..? कुठली शासकीय कामे प्रलंबित आहेत का...? शेतजमीन समस्या, रस्ते, नाले आणि इतर समस्या असेल तर त्याची नोंद एका रजिस्टरमध्ये केली आहे. याशिवाय 9 ऑक्टोबरला ठरलेल्या ठिकाणी येण्याची विनंती ही करण्यात येत आहे. आर्वी मतदारसंघ हा मोठा असल्याने प्रत्येक घरी आमदार स्वतः जाऊ शकत नसल्याने प्रत्येक गावागावात आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जात अगदी डोअर टू डोअर जाऊन नागरिकांना समस्या विचारून त्याच्या नावापुढे लिहिल्या जात आहे.

नक्की वाचा - Akola News : 'प्रशासन ऐकत नाही, म्हणून फाशी घेईन', अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांसमोरच नागरिकाचा संताप
काय आहे उपक्रम आणी कोण आहेत हे आमदार
वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच आमदार आपल्या दारी हा विशेष उपक्रम आमदार सुमीत वानखडे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली आमदारांच्या समवेत उपस्थित राहणार असून नागरिकांनी सांगितलेल्या समस्या तात्काळ सोडविण्यात येणार आहे. यासाठी 9 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली असून या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे आपले मत वाया गेले नाही अशी भावना तुर्तास तरी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world