विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena Vs Shivsena) असा थेट सामना अनेक मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 47 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे सेना आणि ठाकरे सेना असे दोन गट पडले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील हे दोन्ही गट आमने सामने दिसून येत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होत आहे.
महायुतीमध्ये भाजप 152, शिंदे गट 82 तर अजित पवार गट 55 जागांवर निवडणूक लढवत आहे. अद्यापही चार जागांवरील गोंधळ कायम आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेस 100 पेक्षा जास्त ठाकरे गट 90 तर शरद पवार गटाकडून 87 जणं निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे दहा जागांवर अद्यापही गोंधळ पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा - नेत्यांचे निकटवर्तीय राजकारणात वाटा शोधताना, देवेंद्र फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकही आमदारकीच्या वाटेवर!
कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना पाहायला मिळणार आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यावर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व पाहायला मिळतं. त्यात आनंद दिघे यांचे पुतणे केदार शिंदे या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. त्याशिवाय सिल्लोडमधील, अब्दुल सत्तार (SS) विरुद्ध सुरेश बनकर (UBT), औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट (SS) विरुद्ध राजू शिंदे (UBT), बुलढाण्यातून संजय गायकवाड (SS) विरुद्ध जयश्री शेळके (UBT), ओवळा-माजीवडामधून प्रताप सरनाईक (SS) विरुद्ध नरेश मणेरा (UBT) याकडे सर्वांचच लक्ष असेल. कोकणातील रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघात महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येथे कोण विजयाची तुतारी फुंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष...
चोपडा
चंद्रकांत सोनवणे (SS)
राजू तडवी (UBT)
बुलढाणा
संजय गायकवाड (SS)
जयश्री शेळके (UBT
मेहकर
संजय रायमुलकर (SS)
सिद्धार्थ खरात (UBT)
बाळापूर
बळीराम शिरसकर (SS)
नितीन देशमुख (UBT)
रामटेक
आशिष जैस्वाल (SS)
विशाल बरबटे (UBT)
कळमनुरी
संतोष बांगर (SS)
संतोष टारफे (UBT)
परभणी
आनंद भरोसे (SS)
राहुल पाटील (UBT)
सिल्लोड
अब्दुल सत्तार (SS)
सुरेश बनकर (UBT)
कन्नड
संजना जाधव (SS)
उदयसिंह राजपूत (UBT)
औरंगाबाद पश्चिम
संजय शिरसाट (SS)
राजू शिंदे (UBT)
पैठण
विलास भुमरे (SS)
दत्ता गोर्डे (UBT)
वैजापूर
रमेश बोरनारे (SS)
दिनेश परदेशी (UBT)
नांदगाव
सुहास कांदे (SS)
गणेश धात्रक (UBT)
पालघर
राजेंद्र गावित (SS)
जयेंद्र दुबळा (UBT)
बोईसर
विलास तरे (SS)
विश्वास वळवी (UBT)
भिवंडी ग्रामीण
शांताराम मोरे (SS)
महादेव घाटळ (UBT)
कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (SS)
सचिन बासरे (UBT)
अंबरनाथ
बालाजी किणीकर (SS)
राजेश वानखेडे (UBT)
कल्याण ग्रामीण
राजेश मोरे (SS)
सुभाष भोईर (UBT)
ओवळा-माजीवडा
प्रताप सरनाईक (SS)
नरेश मणेरा (UBT)
कोपरी-पाचपाखाडी
एकनाथ शिंदे (SS)
केदार दिघे (UBT)
मागाठणे
प्रकाश सुर्वे (SS)
उदेश पाटेकर (UBT)
विक्रोळी
सुवर्णा करंजे (SS)
सुनील राऊत (UBT)
भांडुप पश्चिम
अशोक धर्मराज पाटील (SS)
रमेश कोरगावकर (UBT)
जोगेश्वरी पूर्व
मनिषा वायकर (SS)
अनंत (बाळा) नर (UBT)
दिंडोशी
संजय निरुपम (SS)
सुनील प्रभू (UBT)
अंधेरी पूर्व
मूरजी पटेल (SS)
ऋतुजा लटके (UBT)
चेंबुर
तुकाराम काते (SS)
प्रकाश फातर्पेकर (UBT)
कुर्ला
मंगेश कुडाळकर (SS)
प्रविणा मोरजकर (UBT)
माहिम
सदा सरवणकर (SS)
महेश सावंत (UBT)
वरळी
मिलिंद देवरा (SS)
आदित्य ठाकरे (UBT)
भायखळा
यामिनी जाधव (SS)
मनोज जामसुतकर (UBT)
कर्जत
महेंद्र थोरवे (SS)
नितीन सावंत (UBT)
महाड
भरतशेठ गोगावले (SS)
स्नेहल जगताप (UBT)
नेवासा
विठ्ठलराव लंघे पाटील (SS)
शंकरराव गडाख (UBT)
उस्मानाबाद
अजित पिंगळे (SS)
कैलास पाटील (UBT)
परांडा
तानाजी सावंत (SS)
राहुल ज्ञानेश्वर पाटील (UBT)
बार्शी
राजेंद्र राऊत (SS)
दिलीप सोपल (UBT)
सांगोला
शहाजी बापू पाटील (SS)
दीपक आबा साळुंखे (UBT)
पाटण
शंभूराज देसाई (SS)
हर्षद कदम (UBT)
दापोली
योगेश कदम (SS)
संजय कदम (UBT)
गुहागर
राजेश बेंडल (SS)
भास्कर जाधव (UBT)
रत्नागिरी
उदय सामंत (SS)
सुरेंद्रनाथ (बाळ) माने (UBT)
राजापूर
किरण सामंत (SS)
राजन साळवी (UBT)
कुडाळ
नीलेश राणे (SS)
वैभव नाईक (UBT)
सावंतवाडी
दीपक केसरकर (SS)
राजन तेली (UBT)
राधानगरी
प्रकाश आबिटकर (SS)
के. पी. पाटील (UBT)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world