महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा शेवटच्या टप्प्यात आहे. 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. आज भाजपची तिसरी यादी येणार असल्याची माहिती आहे.
आतापर्यंत महायुतीकडून,
भाजप - 121
शिंदे गट - 65
अजित पवार गट - 49
महाविकास आघाडीकडून,
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेस - 99
ठाकरे गट - 84
शरद पवार गट - 76
आतापर्यंत महायुतीकडून 235 जागा तर महाविकास आघाडीकडून 259 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. अद्यापही महायुतीच्या 53 तर महाविकास आघाडीच्या 29 जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.
नक्की वाचा - NDTV Marathi Conclave LIVE : पंकजा मुंडेंना या चार मुद्द्यांवर करायचंय काम; सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय काय घेणार?
27 ऑक्टोबर रोजी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीत एकूण 14 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसनं चौथ्या यादीत आधीचे दोन उमेदवार बदलले आहेत. यामध्ये अंधेरी पश्चिम येथे सचिन सावंत यांच्या जागी अशोक जाधव यांना संधी दिली आहे. तर औरंगाबाद पूर्वमधून मधूकर देशमुख यांच्या जागी लहू शेवाळे यांना पक्षाने तिकीट दिलं आहे. तर शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत शिवसेनेने 45 उमेदवारांची घोषणा केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world