जाहिरात

'लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत...', बच्चू कडूंचा महायुतीवर प्रहार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जर काँग्रेसच्या सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, आम्हाला पाठवा, त्यांचा बंदोबस्त करु... असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते.

'लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत...', बच्चू कडूंचा महायुतीवर प्रहार

तेजस मोहतरे, गोंदिया: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जर काँग्रेसच्या सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, आम्हाला पाठवा, त्यांचा बंदोबस्त करु... असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते. धनंजय महाडिक यांच्या या विधानावरुन आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, असं ते म्हणालेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. गोंदियामध्ये ते माध्यमांशी बोलत होते. 

काय म्हणाले बच्चू कडू? 

भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी  लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी हे काँग्रेसच्या सभेमध्ये दिसत असतील तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला सांगा आम्ही त्यांच्या करेक्ट कार्यक्रम करू असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. हा पैसा का त्यांच्या बापाचा आहे.सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतात त्यांचा हा पैसा आहे. त्यांच्या बापाचा हा पैसा नाही आणि लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती आम्ही दुधाला भाव मागितला होता.आम्ही धान्य पिकाला भाव मागितला होता, पण ते सरकारला जमलं नाही आणि मतासाठी लाडकी बहीण योजना सुरू करता. ही लाडकी बहीण तुम्हाला आता धडा दिल्याशिवाय राहणार नाही अशी खणखणीत टीका त्यांनी धनंजय महाडिक यांच्यासह राज्य सरकारवर केली.

नक्की वाचा: '...म्हणून आयटी इंजिनिअर आमदारकी लढवणार', चिंचवडमधील 'या' उमेदवाराची चर्चा

प्रफुल पटेल यांच्यावर निशाणा..

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. प्रफुल पटेल यांनी अर्जुनी मोरगाव चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना उद्देशून या भागातल्या ठेकेदारांचे पैसे राज्य सरकार थांबवेल, असे विधान केले होते. यावरुनच बच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल केला. प्रफुल पटेल सारखा माणूस धमक्या देत असेल तर आम्ही अंडू पांडू नाही. पुन्हा धमकी दिली तर आम्ही त्यांच्या घरावर जाऊ. प्रफुल पटेल यांनी समजावून घ्यावं त्यांनी अवकातीत राहावं तर आम्ही अवकातीत राहू... त्यांनी अवकात सोडली तर आम्ही त्याच्यापेक्षा भारी आहोत, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.

टेंडिंग बातमी: 'तुमच्यात हिंमत असेल तर', अमित शहांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान, नेमकं काय म्हणाले?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: