जाहिरात

Bachchu Kadu News : बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस

बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली असून त्यांना उठून बसण्यासाठी त्रास होत आहे. 

Bachchu Kadu News : बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली असून त्यांना उठून बसण्यासाठी त्रास होत आहे. सकाळी बच्चू कडू यांना उलट्या झाल्याचंही सांगितलं जात आहे. जेवण न केल्याने बच्चू कडू यांचे वजन चार किलो पेक्षा अधिक किलोने घटलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान तिवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या चमूकडून बच्चू कडूंच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे. बच्चू कडूंनी औषधोपचार घ्यावा,  ऍडमिट व्हावं, असा डॉक्टरांचा सल्ला आहे. मात्र बच्चू कडूनी वैद्यकीय औषधोपचार नाकारल्याची माहिती आहे. 

कलेक्टर दुजाभाव करत आहेत. आम्ही विषमतेविरुद्ध लढतोय. तुम्ही इथे विषमता करत आहात. तुम्ही अधिकारी आहात हे विसरून जाणार असा आक्रमक पवित्रा घेत बच्चू कडूंनी गुरुवारी (ता.१२) उपोषणाच्या पाचव्या दिवशी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना चांगलंच फटकारलं. बच्चू कडूंची प्रकृती खालावत जात आहे. कार्यकर्त्यांकडून बच्चू कडूंना सलाईन घेण्याची विनंती केली जाते. तर दुसरीकडे बच्चू कडूंच्या उपोषणात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची प्रॉपर वैद्यकीय तपासणी न झाल्याने बच्चू कडू कलेक्टरला चांगलाच फटकारलं. 

Beed News : लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक, बीडमधील धक्कादायक प्रकरण

नक्की वाचा - Beed News : लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक, बीडमधील धक्कादायक प्रकरण

महात्मा गांधींच्या मार्गाने सुरू असलेले बच्चू कडू यांचे आंदोलन आता भगतसिंगच्या मार्गाने पुढे जाणार असल्याचं प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी घोषणा केली आहे. १४ जूनला महाराष्ट्रात विविध संघटनाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. प्रहारची महाराष्ट्रातील प्रमुख संघटनांशी बोलणी सुरू आहे.  त्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्रपणे महाराष्ट्रात केले जाणार असल्याची प्रहारने आक्रमक भूमिका घेतली आहे 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com