
Badlapur Barvi Dam : बदलापूरचं बारवी धरण कधीही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव एमआयडीसीनं बारवी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाडच्या तहसीलदारांना तातडीची सूचना जारी केली आहे.
बारवी धरणाची ओव्हरफ्लो होण्याची पातळी 72.60 मीटर असून शुक्रवारी दुपारी पाणी 70.60 मीटर इतकी होती. पाणीपातळी 72.60 मीटरपर्यंत जाताच धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाण्याच्या दाबाने आपोआप उघडले जातात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो. सध्या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे . पावसाचा जोर असाच राहिला तर लवकरच बारवी धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट, पालघर-भंडाऱ्यातील शाळांना सुट्टी जाहीर
याच पार्श्वभूमीवर एमआयडीसीने एक तातडीची सूचना जारी केली आहे. यात बारवी नदीलगत असलेल्या असलेली चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागाव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, चोण मोऱ्याचा पाडा, रहाटोली या गावांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर बारवी आणि उल्हास नदी लगतच्या इतर गावं आणि शहरांनाही सतर्कतेच्या सूचना एमआयडीसीकडून देण्यात आल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world