
भारत-पाकिस्तान तणाव वाढत असताना महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापूर नगरपरिषदेच्या वेबसाइटवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. बदलापूर नगपरिषदेच्या वेबसाईटवर हॅक झाल्याचा संदेश झळकला आहे. वेबसाइट हॅक झालं नसून व्हायरस असल्याचा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दावा केला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव पालिकेची वेबसाईट सध्या बंद करण्यात आली आहे.
ही वेबसाइट हॅक करण्यामागे पाकिस्तानचा संबंध असल्याची चर्चा आहे. या वेबसाइटवर You Have been Hacked PAF Cyber Force, Operation Bunyan Al-Marsous असा संदेश लिहिण्यात आला आहे. याचा अर्थ अद्याप तरी कळू शकलेला नाही. Bunyan याचा संबंध पाकिस्तानाशी आहे का याचाही शोध घेतला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world