31st December Celebration News: नाताळ आणि नवे वर्ष 2026च्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागरिकांपासून हॉटेल व्यावसायिकांनाही राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या विशेष आदेशानुसार 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर अशा तीन दिवशी राज्यातील मद्यविक्रीची दुकानं, बारच्या वेळांमध्ये मोठी शिथिलता देण्यात आलीय. यानुसार राज्यातील विविध मद्यविक्री अनुज्ञप्त्या निर्धारित वेळेनंतर रात्री उशीरापर्यंत सुरू राहतील. शासनाने यासंदर्भात परिपत्रकही जारी केलंय.
कोणत्या अनुज्ञप्तीच्या प्रकारानुसार मद्यविक्री करण्यास किती वाजेपर्यंत सूट देण्यात आलीय, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
1. एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान) (FL-II VENDOR LICENCEES):
रात्री 10.30 वाजेपासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत (AM) परवानगी
2. उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल-2 अनुज्ञप्ती:
रात्री 11.30 वाजेपासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत (AM) परवानगी
3. एफएलडब्ल्यू - 2 आणि एफएलबीआर-2 अनुज्ञप्ती:
रात्री 10.30 वाजेपासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत (AM) परवानगी
4. एफएल-3 (परवाना कक्ष) आणि एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती) :
पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी
5. नमुना ई (बीअर बार), ई-2 परवाना :
मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी
6. सीएल-3 परवाना:
महानगरपालिका तसेच "अ" आणि "ब" वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 वाजेपासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत आणि इतर ठिकाणी रात्री 10 वाजेपासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीय.
ही सूचना देखील लक्षात ठेवाउपरोक्त वेळेच्या शिथिलतेच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार उपरोक्त वेळेची शिथिलता कमी करू शकतील, असेही जारी केलेल्या पत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
(नक्की वाचा: Winter Health News: हिवाळ्यात दारू पिऊ शकतो? एका दिवसात किती दारू प्यावी, 99% लोकांना माहितीच नाहीय अचूक उत्तर)
दरम्यान नवीन वर्षाच्या जल्लोषादरम्यान नो ड्रिंक अँड ड्राइव्ह नियमाचे काटेकोर पालन करावे, वाहतुकीचे अन्य नियमही मोडू नये.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world