जाहिरात

Shirdi Sai Baba: अबब! साईबाबांच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान; अवघ्या 9 दिवसात 'इतक्या' कोटींची देणगी

यंदाही साईभक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी साईबाबांच्या चरणी भरभरुन दान केले. 

Shirdi Sai Baba: अबब! साईबाबांच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान; अवघ्या  9 दिवसात 'इतक्या' कोटींची देणगी

सुनील दवंगे, शिर्डी:

Shirdi Saibaba Mandir News: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी साईनगरीत भक्तांचा अलोट उत्साह पाहायला मिळाला. शिर्डीच्या साईबाबांवर देश आणि दुनियातील भाविक मोठ्या प्रमाणात श्रद्धा ठेवतात. ख्रिसमसच्या सुट्या आणि नविन वर्ष साईमंदिरात साजर व्हावे यासाठी भाविकांची शिर्डीला पसंती असते. यंदाही साईभक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी साईबाबांच्या चरणी भरभरुन दान केले. 

 शिर्डीमध्ये साईबाबांची चरणी भरभरुन दान..

यंदा 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या दरम्यान साईसंस्थानच्या वतीनं शिर्डी महोत्सवाच आयोजन करण्यात आलं होते. यंदा नाताळाच्या  पहिल्या दिवसापासूनच साईबाबांची शिर्डी भाविकांनी गजबजल्याची पाहायला मिळाली. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या नऊ दिवसांच्या काळात तब्बल आठ लाख भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी साईबाबांच्या झोळीत २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपयांचे महादान अर्पण केले आहे. 

Solapur News: डोळ्यात चटणी टाकली अन् सपासप वार.. मनसे नेत्याच्या हत्येची INSIDE स्टोरी

विशेष म्हणजे, २०२५ च्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत आणि दानात दीड पटीनं वाढ झाली असून, दानाचा हा आकडा नवा विक्रम प्रस्थापित करणारा ठरला आहे. ​साईसंस्थानने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, दानपेटीत ६ कोटी २ लाख रुपये जमा झाले आहेत, तर देणगी काउंटरवर ३ कोटी २२ लाख रुपये प्राप्त झाले. ऑनलाइन बँकिंग, चेक आणि आरटीजीएसच्या माध्यमातून १० कोटी १८ लाख रुपयांचा ओघ सुरू होता.

९ दिवसात २३ कोटी २९ लाखांची देणगी

परकीय चलनाबाबत बोलायचे झाले तर २६ देशांतील भाविकांनी १६ लाख ८३ हजार रुपयांचे चलन अर्पण केले आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे एका भक्ताने अर्पण केलेला ८० लाख रुपये किमतीचा सुवर्ण हिरेजडित मुकुट. ​केवळ आर्थिक दानच नव्हे, तर प्रसादालयात ६.५ लाख भाविकांनी भोजन घेतले आणि १४.५ लाख लाडू प्रसादाची विक्री झाली. 

VBA Candidate List: वंचित आघाडीच्या 46 उमेदवारांची फायनल यादी समोर; 1 अर्ज बाद; पाहा सर्व उमेदवार

साईसंस्थानच्या निवासस्थानांमध्ये १ लाख ३९ हजार भाविकांनी मुक्काम केला. साईबाबांच्या तिजोरीत सध्या ३३२८ कोटींच्या ठेवी असून, ५४० किलो सोने आणि ७००० किलो चांदीचे साठे आहेत. हे संकलित झालेले दान रुग्णालय, शिक्षण आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी वापरले जाणार असल्याची माहिती संस्थानने दिली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com