जाहिरात

सरपंचाच्या हत्येने बीड हादरलं; पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप, संसदेत उमटणार पडसाद?  

बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख (वय 45) यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सरपंचाच्या हत्येने बीड हादरलं; पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप, संसदेत उमटणार पडसाद?  
बीड:

बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख (वय 45) यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन टर्म सरपंच असलेले संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. एनसीपी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी घटनेचा निषेध केला आहे.

पुणे हादरलं! आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला 

नक्की वाचा - पुणे हादरलं! आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला 

ते उद्या 10 डिसेंबर रोजी लोकसभेत हा मुद्दा मांडणार असल्याची माहिती आहे. त्या संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात संताप व्यक्त केला आहे. संतोष देशमुख यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. संतोष देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी सांगायचं झाल्यास ते 2012 ते 2017 या कालावधीत उपसरपंच, 2017 ते 2022 सरपंच आणि 2022 ते आजपर्यंत ते सरपंच म्हणून काम करीत होते. 

One Nation, One Election : 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

नक्की वाचा - One Nation, One Election : 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सरपंचाला हत्या झाल्याची घटना घडली आहे. संतोष पंडितराव देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि 6 वाजता त्याचा मृत्यू झाला. खासदार सोनावणेंनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणात एसपींना अनेकदा फोन केला होता, परंतू त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप सोनावणेंनी केला आहे. यामागे राजकीय व्यक्तीचा हात दिसून येत आहे. पोलिसांनी चौकशी करून तत्काळ आरोपींवर कारवाई करायला हवी यासाठी हा मुद्दा उद्या संसदेत मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

नेमकं काय घडलं?
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून खून झाल्याची घटना समोर समोर आली आहे. संतोष देशमुख असं सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आला आहे.  सरपंच आणि त्यांचा भाऊ धारूर हून केजच्या दिशेने जात असताना अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून सरपंचांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने केला आहे. सरपंचाचे भाऊ शिवराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय. देशमुख यांचा मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून मोठा जमाव या ठिकाणी जमला आहे.