Beed News : जेवणाचं बिल घेऊन आलेल्या वेटरला बेदम मारहाण, गाडीला लटकवून फरफटत नेलं; घटना CCTV मध्ये कैद

मिळाळेल्या माहितीनुसार, मेहकर -पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखाराम मुंडे आणि अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते.

Advertisement
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड

बीडमध्ये जेवणाचे बिल मागणे बेटरला चांगलंच महागात पडलं आहे. जेवण झाल्यानंतर स्कॅनर गाडीजवळ घेऊन बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या वेटरला बिल देण्यास नकार देत एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याची घटना समोर आली आहे. ऐवढेच नाहीतर गाडीतील तिघांनी वेटरला मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले.

मिळाळेल्या माहितीनुसार, मेहकर -पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखाराम मुंडे आणि अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते. हॉटेलमध्ये पोटभर जेवण केल्यानंतर त्यांनी  वेटर शेख साहिल अनुसूद्दीनला बिल घेऊन ये असं सांगितले. 

(नक्की वाचा -  Pune Hit and Run : पुण्यात आणखी एक हिट अँड रन; मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू)

वेटरने बिल दिल्यानंतर स्कॅनर घेऊन ये म्हणत तिघेजण गाडीत जाऊन बसले. वेटर स्कॅनर घेऊन गेला असता, कशाचे बिल म्हणत तिघांनी वाद घालायला सुरुवात केली. तू आमच्याकडे बिल मागतोस का? असं म्हणत चालका शेजारी बसलेल्या एकाने वेटरला दरवाजाच्या बाहेर पकडून थेट एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले.

निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवत तिघांनी वेटरला बेदम मारहाण  केली. त्यांतर वेटरच्या खिशातील 11 हजार 500 रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. तसेच डोळ्याला पट्टी बांधून शनिवारी रात्रभर वेटरला गाडीमध्येच ठेवले.

(नक्की वाचा-  पुण्याला समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडणार, पुणे-शिरूर महामार्गाला राज्य सरकारची मंजुरी))

दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरुन दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.  पुढील तपास दिंद्रुड पोलीस करत आहेत. 

Topics mentioned in this article