जाहिरात

Pankaja Munde: 'गुंडाला गुंड, बंडाला बंड; मी कोणाला घाबरत नाही...', पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?

श्रीक्षेत्र संस्थान संत मीराबाई संस्थान येथे मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली उपस्थिती लावली. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी मी गुंडाला गुंड आहे, असे म्हणत जोरदार फटकेबाजी केली. 

Pankaja Munde: 'गुंडाला गुंड, बंडाला बंड; मी कोणाला घाबरत नाही...', पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?

स्वानंद पाटील, बीड: बीडच्या पाटोदा येथील संत मीराबाई संस्थानावर अखंड हरिनाम सप्ताह गत सात दिवसापासून सुरू असून या सप्ताहाची सांगता आज होत आहे. या सांगते प्रसंगी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण व पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच श्रीक्षेत्र संस्थान संत मीराबाई संस्थान येथे मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली उपस्थिती लावली. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी मी गुंडाला गुंड आहे, असे म्हणत जोरदार फटकेबाजी केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाल्या पंकजा मुुंडे?

'मुंडे साहेब असताना ते इथे कार्यक्रमाला येत होते.  गडावर का जातात हे माहित नाही. पण मी लोक आपले असतात म्हणून येत असते.  राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणाऱ्या माणसाने राजकारणात हस्तक्षेप करू नये. - काही जणांना स्वतःचे स्वागत स्वतःच करून घ्यायची सवय असते,' अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

तसेच "लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूप जणांचे प्रेम वाढले. मंत्री झाले काय आणि नाही झाले काय मला काही फरक पडत नाही आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. त्या प्रेमाच्या बदलात मी तुम्हाला विकास आणि न्याय देऊ शकते. बीड माझंच आहे मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, असे म्हणत गोपीनाथ मुंडेची लेख कुणाची मिंधी नाही..'' असा जोरदार प्रहारही त्यांनी केला. 

(नक्की वाचा-  Political News : CM फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीचं कारणं काय? समजून घ्या राजकीय अर्थ)

"ज्या दिवशी लोक नाही म्हणतील त्या दिवशी तुमची ताई स्वाभिमानाने घरच्या गादीवर बसेल. माझ्या बापाने दुःख भोगलेय त्या कष्टाबद्दल मला आदर आहे. मी गुंडाला गुंड आहे, बंडाला बंड आहे, कोणाला घाबरत नाही. माझ्या कर्मभूमीकडे माझे बारीक लक्ष असते, असे म्हणत तुम्ही करत असलेल्या प्रेमाची किंमत कशातच मोजू शकत नाही," असे विधानही त्यांनी केले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: