मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायाची मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी 13 जानेवारी रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. 2 कोटीच्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले आहे. दरम्यान आज वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार आहे. दुसरीकडे आज महाकुंभचा दुसरा दिवस आहे. महाकुंभात आज दुसरं शाही स्नान होणार आहे. महाकुंभच्या पहिल्या दिवशी तब्बल दीड कोटी भाविकांनी कुंभ स्नानाचा लाभ घेतल्याची माहिती आहे.
धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन परळीसाठी रवाना
मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन परळीसाठी रवाना
परळीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांची चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून घेतला परळीचा आढावा
येत्या दोन दिवसात परळी येथील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती.
Beed News : परळीत कराड समर्थक आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न
वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत कराड समर्थक आक्रमक
कराड समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
एका समर्थकाचा पाय भाजला, रुग्णालयात दाखल
अकोल्यात युवकाचा मांजाने गळा चिरून मृत्यू
अकोल्यात किरण सोनोने या युवकाचा मांजाने गळा चिरून मृत्यू झाला आहे. किरण अकोला शहरातील अकोटफैलचा रहिवाशी आहे. शहरातील सिंधी कँप येथील संत झुलेलाल उड्डाणपुलावरून दुचाकीने नेहरू पार्ककडे जाताना मांजा गळ्यात अडकला. मांजा गळ्यात अडकल्याने किरणचा गाडीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला.
जळगावात पतंग उडवताना दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने 7 वर्षीय मुलगा गंभीर जखमी
जळगावात पतंग उडवताना दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने 7 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. श्लोक कैलास गिरगुणे असे 7 वर्षीय गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात तो त्याच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पतंग उडवत होता. जळगाव शहरातील सारा हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
धाराशिवमध्ये अंगावर पेट्रोल ओतून महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अध्यक्षा सारिका चोंगे आक्रमक
तुळजापूर शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
पोलिसांनी व नागरिकांनी वेळीच अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला
भूमी अभिलेख चे अधिकारी सर्वसामान्य माणसाची मोठी अडवणूक करतात असा आरोपही त्यांनी केला आहे ते कोणतेही कामे करत नाहीत.
राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या सूचना
शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करण्याचा निर्णय
चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्नचा विचार केला जाणार असून पुढच्या टप्प्यात सीबीएससी पॅटर्नच्या ज्या चांगल्या बाबी आहेत, त्या शाळांच्या अभ्यासक्रमात घेतल्या जाणार
सन 2026-27 मध्ये सीबीएसई पॅटर्नचा वापर होईल, राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीतापाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य
मराठी भाषा प्रत्येक शाळात शिकवणं सक्तीचं करण्याबाबत महत्वाचा निर्णय
वाल्मिक कराडची तब्येत खालावली, रुग्णालयात उपचार सुरु
अवादा कंपनी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत खालावली
वाल्मिक कराडवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
नंदुरबारमध्ये पतंग उत्सवदरम्यान 7 वर्षीय बालकाचा दोऱ्याने गळा कापून दुर्दैवी मृत्यू
नंदुरबारमध्ये पतंग उत्सवदरम्यान 7 वर्षीय बालकाचा दोऱ्याने गळा कापून दुर्दैवी मृत्यू
मयत कार्तिक एकनाथ गोरवे आजोबासोबत मोटरसायकलीवर जात असताना घडली घटना
जिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात येत असून नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
Palghar News : दुचाकी आणि लहान टेम्पोची समोरासमोर धडक, तिघे जण गंभीर जखमी
पालघरच्या तांदुळवाडी - चहाडे मार्गावर लालठाणे येथे भरधाव मोटार सायकल आणि टेम्पोची समोरासमोर धडक. दुचाकीवरील दोघे आणि टेम्पो चालक असे तीन तीन जण गंभीर जखमी. दोघांचीही प्रकृती चिंताजनक. दोघांनाही उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा SIT कडे ताबा
वाल्मिक कराडवर कारवाईचा फास आवळला
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा SIT कडे ताबा
वाल्मिक कराडला उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार
Live Update : वाल्मिक कराडांवर मोक्का, कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक
वाल्मिक कराडांवर मोक्का, कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक
वाल्मिक कराडांवर मोक्का लागल्यानंतर कराड समर्थक आक्रमक
वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात आला
वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होणार आहे. शिवाय त्याला आता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे.
Live Update : संकेतस्थळावर खंडणीखोरांविरोधात तक्रार करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार
संकेतस्थळावर खंडणीखोरांविरोधात तक्रार करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार
पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर त्याची अंमलबाजवणी केली जाणार
बीड जिल्ह्यातील उद्योगांना खंडणी मागण्याच्या कहाणी पुढे येत असताना पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
Live Update : भाजपसोबत जाण्याचे एकाही खासदाराचं मत नाही. भाजपसोबत जाणार हा जावई शोध कोणी लावला? - शरद पवार
भाजपसोबत जाण्याचे एकाही खासदाराचं मत नाही. भाजपसोबत जाणार हा जावई शोध कोणी लावला?
Live Update : केस गळती प्रकरणी आयुष मंत्रालयाच्या होमीओपॅथी, आयुर्वेद, युनानीचे पथक गावात दाखल
केस गळती व टक्कल आजारावर संशोधन करण्याच्या दृष्टीकोनातुन केंद्रीय आयुष मंत्रालयाचे पथक जिल्हयात दाखल झाले असुन त्यांनी टक्कल ग्रस्त गावातील रुग्णांशी संवाद साधून माहिती संकलित करण्याचे काम करत आहे. तर भारतीय वैद्यकिय संशोधन परिषद अर्थात ICMR च्या शास्त्रज्ञांचे दिल्ली आणि चेन्नईचे पथकही दाखल झाले आहे. दरम्यान रुग्णांची संख्या 156 वर पोहोचली आहे. हा त्रास आता जवळच्या नांदुरा आणि आणि अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातही पोहोचल्याची माहिती आहे. दरम्यान सकाळपासून 12 गावात सर्व्हे सुरू झाले आहे.
Live Update : केज कोर्टात वाल्मिक कराड दाखल...
केज कोर्टात वाल्मिक कराड दाखल...
Live Update : बीडमध्ये जमावबंदीचे आदेश, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय
बीडमध्ये जमावबंदीचे आदेश, बीडमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय
Live Update : वाल्मीक कराडला न्यायालयात हजर करणार, सुरक्षेसाठी रस्ते मार्गही बदलला
वाल्मीक कराडला न्यायालयात हजर करणार
न्यायालयात हजर करण्यासाठी बीडहून ताफा रवाना
नेहमीच्या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने नेल जातंय
केजला जाण्यासाठी दोन मार्ग असल्यानं मार्ग बदलला
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची खबरदारी
Live Update : वाल्मिक कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
वाल्मिक कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय केला जात असल्याचं वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे.
Live Update : वाल्मिक कराडला घेऊन पोलीस केज कोर्टाकडे निघाले...
वाल्मिक कराडला घेऊन पोलीस केज कोर्टाकडे निघाले...
Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची आज देवगिरी निवासस्थानी बैठक
दर मंगळवारी कॅबिनेट बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत होणार
गेल्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्र्यांचे जनता दरबार आणि मंत्र्यांची बैठक आयोजन करण्यात आली होती. या सरकारमध्ये त्यात काही बदल करण्यात आलेले नाही.
अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये पक्षाची संघटना आणि जनतेची काही कामे यासंदर्भात काही अडी-अडचण असेल तर त्या सोडविण्यासाठी या बैठकीच आयोजन करण्यात येत आहे
Live Update : कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच मंचावर
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत.16 ते 20 जानेवारी दरम्यान बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 तारखेला सकाळी आठ वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री पंकजा मुंडे , मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
Live Update : पानीपत येथे शौर्य दिवस समारोहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
पानीपत येथे शौर्य दिवस समारोहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हरियाणा, पंजाब दिल्ली आणि महाराष्ट्रातून अनेक शिवभक्त पानीपत येथे दाखल झाले आहेत.
Live Update : पुण्यात भोगी, संक्रांतीमुळे फळभाज्यांची विक्रमी आवक
पुण्यात भोगी, संक्रांतीमुळे फळभाज्यांची विक्रमी आवक
पुण्यातील मार्केट यार्डमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 150 ट्रक फळभाज्यांची आवक
तर भाज्यांचा दरामध्ये देखील मोठी वाढ
भेंडी, पापडी, वाल, पावटा, वांगी, गाजर, भुईमूग शेंगाच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर फळभाज्यांचे भाव मात्र स्थिर आहेत.
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये भाज्यांचे भाव अधिक वाढण्याची शक्यता
Live Update : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश
विविध आरक्षणा आंदोलनाची दाहकता लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मध्यरात्रीपासून हे आदेश लागू असणार आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे करण्यासाठी जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
Live Update : 'फ्री फायर’ या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून मैत्री, अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
'फ्री फायर’ या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १२ जानेवारीला उघडकीस आली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी (२२ रा. मालेगाव जि.नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.अहेरीच्या एका १४ वर्षीय मुलीची त्याच्याशी फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली होती. यातून दोघांत रोज चॅटींग व्हायचं. त्यानंतर फोनवरुन बोलणे सुरू झालं. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत आरोपी तरुणाने ११ जानेवारीला नाशिकहून अहेरी गाठलं. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी त्याने मुलीच्या घरी मुक्काम करुन अत्याचार केला. दरम्यान, सकाळी काही लोकांना पीडित मुलीच्या घरी अनोळखी तरुण असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी मुलीच्या घरातून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर मुलीचा जबाब नोंदवून कलम ६४०(१),६५ (१) भारतीय न्याय संहिता,सह कलम ४,६ लैंगिक अपराधा पासून बालसंरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
Live Update : कराड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रकची धडक, तरुणीचा जागीच मृत्यू
कराड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका येथे एका ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात काॅलेजची युवती ठार झाल्याची घटना घडली असून जमावाने घटनास्थळी गर्दी केली आहे. सोनिया अविनाश कांबळे असे 20 वर्षीय युवतीचे नांव असून ती कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थींनी आहे. बीडीएसच्या दुसऱ्या वर्षाला सोनिया शिक्षण घेत होती, महाविद्यालय सुटल्यानंतर घरी परतताना हा अपघात झाला आहे.
Live Update : बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती...
बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती... संपूर्ण बदलापूर शहरात पसरला रासायनिक गॅस... रासायनिक कंपनीतून गॅस लिक झाल्याची शक्यता... बदलापूरकरांना घशाची खवखव, डोळे चुरचुरणे असा त्रास सुरू
Live Update : वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याची 14 दिवसाची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज कराड याला दुपारी केज येथील न्यायालयात हजर केले जाईल. गेले चौदा दिवस झाले कराड याला बीड येथील शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.14 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण होत आहे.आज न्यायालयात काय सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.