जाहिरात
This Article is From Apr 26, 2024

आधी लगीन लोकशाहीचं! मंडपात जाण्यापूर्वी नवरदेव - नवरी मतदान केंद्रावर

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन या नवरदेवान केलं आहे.

आधी लगीन लोकशाहीचं! मंडपात जाण्यापूर्वी नवरदेव - नवरी मतदान केंद्रावर
मुंबई:

देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. आज देशातील 12 राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. दरम्यान सध्या लग्नसराईदेखील सुरू आहे. मात्र लग्नाच्या घाईत नवरा-नवरी आवर्जुन मतदानासाठी केंद्रावर हजर राहत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकाने घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असा संदेश वारंवार अनेकांकडून दिला जातो. दरम्यान आज अमरावती, हिंगोली, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात नवरा-नवरदेव मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. 

अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी नवरदेव केंद्रावर पोहोचला आहे. बच्चू कडू यांच्या बेलोरा गावात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बोहल्यावर चढायच्या आधी स्वप्नील कन्हेरकर या नवरदेवाने आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन देखील यावेळी केलं. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आज साजरा होतोय.

Latest and Breaking News on NDTV

आज विवाह समारंभाची मोठी तिथी आहे, त्यामुळे हिंगोलीच्या वांझोळा येथे मेनका रामकिसन गावंडे या नववधुने सकाळी लग्नाच्या 1 तास अगोदर मतदानाचा हक्क बजावला. बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीने आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

Latest and Breaking News on NDTV

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रफुल बाबाराव राऊत या युवकाचं आज लग्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे लग्न असताना वरात निघालीय पण आधी लगीन लोकशाहीचे म्हणत या नवरदेवाने मतदानाचे कर्तव्य बजावले आहे. वाशिममधून अशीच घटना समोर आली आहे. रवी विठ्ठल खवळे यांचा शुभविवाह आज शेलुबाजार येथे पार पडणार आहे.

Latest and Breaking News on NDTV

त्याआधी मतदानाचे महत्त्व पटवून देण्याकरता या नवरदेवान सर्व विवाहाच्या कार्यक्रमाचे नियोजन बाजूने ठेवून आधी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने रिसोड येथील नागरिकांनी त्याचे स्वागत केले. वाशिमच्या रिसोड इथं नवरदेवान मतदान केंद्रात जाऊन लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने लग्नाच्या मंडपात वरमाला टाकण्याआधीच मतदानाचा हक्क बजावला. त्या वेळेस मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात नावरदेवांच स्वागत केलं. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन या नवरदेवान केलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com