जाहिरात

Bhandara News: पवनी गडकिल्ला परिसरातील अतिक्रमणचा वाद! 200 जणांची धरपकड, परिसरात मोठा तणाव

अतिक्रमण काढण्याचे शासनाचे आदेश असल्याने 183 अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Bhandara News: पवनी गडकिल्ला परिसरातील अतिक्रमणचा वाद! 200 जणांची धरपकड, परिसरात मोठा तणाव

 मुकेश कुमार, भंडारा: पवनी गडकिल्ला परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या विरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी काही आक्रमक आंदोलकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत दोनशेवर अतिक्रमणधारकांना अटक केली व त्यानंतर तात्काळ सुटका करण्यात आली. या सगळ्या प्रकाराने पोलिस ठाणे परिसरात मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  पवनी येथील गडकिल्ला परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मुद्यावरून ' नागरिक संतप्त झाले. या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. ' याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली ' ताब्यात घेऊन नंतर सुटका केली. पवनी शहरातील गडकिल्ल्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्याचे शासनाचे आदेश असल्याने 183 अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

या आदेशाला अतिक्रमणधारकांचा विरोध आहे. पुनर्वसन करून राहण्याची सोय करा, नंतरच अतिक्रपरण हटवा, अशी अतिक्रमणधारकांची मागणी आहे. दरम्यान, गुरुवारी या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा हृशारा देत तहसिल कार्यालयाच्या परिसरात साहित्यासह जमा झालेल्या अतिक्रमणधारकांनी लाकडाची होळी करून ती पेटविण्याचा प्रयत्न केला.

( नक्की वाचा : Amrit Stations : राज्याला मिळणार 15 अमृत स्टेशन, PM मोदी करणार उद्घाटन )

या दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन व्हॅनमधून पोलिस ठाण्यात नेले. यात शेकडो महिला-पुरुषांचा समावेश होता. या सर्वांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवई नंतर सुटका करण्यात आली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com