Maharashtra Politics: ठाकरेंना दणका, शिंदेंना फटका! रायगडमध्ये अजित पवारांची मोठी खेळी, 'या' प्रवेशाने गेम फिरवला

Raigad Politics Snehal Jagtap News: रायगडमध्येही ठाकरे गटाला खिंडार पडले असून ठाकरे गटाकडून विधानसभा लढवणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

मेहबूब जमादार, रायगड: विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागल्याचे दिसत आहे. मुंबई पुण्यासह कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. आता रायगडमध्येही ठाकरे गटाला खिंडार पडले असून ठाकरे गटाकडून विधानसभा लढवणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाड विधानसभा मतदार संघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार, महाडच्या माजी नगराध्यक्षा तसेच माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप या ठाकरेंची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. एकीकडे ठाकरे गटासाठी हा मोठा  धक्का मानला जात असतानाच शिंदे गटाचे नेते भरत गोगोवलेंना रोखण्यासाठीही सुनील तटकरेंनी ही मोठी खेळी केली आहे. 

नक्की वाचा - Sanjay Raut rokhthok : 'नागपूर हिंसाचार फडणवीसांच्या बदनामीसाठी', संजय राऊतांच्या विधानाने खळबळ

आज स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील गीताबाग या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी स्नेहल जगताप यांच्यासह नाना जगताप, श्रेयस जगताप तसेच महाड पोलादपूर तालुक्यातील ठाकरे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सुनील तटकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोबाईल वरून फोन करत संभाषण घडवून आणले.

(नक्की वाचा- Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला)

यावेळी 14 एप्रिल नंतर दोन दिवसांत पक्षप्रवेशासाठी मुहूर्त ठरविण्यात येणार असून महाड येथे एका भारदस्त कार्यक्रमात अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. सध्या  रायगडच्या राजकारणात सध्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला आहे. त्यातच मंत्री भरत गोगावले व खासदार सुनील तटकरे यांच्यातून विस्तव जात नसल्याने जगताप यांच्या प्रवेशाने तटकरे यांनी गोगावले यांना राजकारणात शह दिल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

एकेकाळी महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचे दिवंगत वडील माजी आमदार माणिकराव जगताप व सुनील तटकरे हे माजी केंद्रीय मंत्री बॅ. अंतूले साहेबांचे कट्टर शिष्य मानले जात होते. त्यानंतर तटकरे शरद पवार राष्ट्रवादीत तर माणिकराव जगताप काँग्रेस मधेच स्थिरसावर झाले. माणिकराव जगताप व महाडचे मंत्री भरत गोगावले यांच्या महाड विधानसभेत 4 वेळा आमना सामना झाला आहे.

ट्रेंडिंग बातमी - CM Devendra Fadnavis : नागपूर हिंसाचारात झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाणार : देवेंद्र फडणवीस

दरम्यान, माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर त्यांची कन्या यांनी ठाकरेंच्या सेने मध्ये प्रवेश केला होता. मागील विधानसभेत त्यांनी विद्यमान मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आज त्यांनी ठाकरे यांची सेना सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
 

Advertisement