जाहिरात

CM Devendra Fadnavis : नागपूर हिंसाचारात झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाणार : देवेंद्र फडणवीस

Nagpur Violence news : नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून हिंसाचाऱ्याच्या घटनेचा आढावा घेतला. यावेळी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. 

CM Devendra Fadnavis : नागपूर हिंसाचारात झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाणार : देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis : नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या हिंसाचारात झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाणार आहे. तसेच दंगेखोरांनी हे पैसे भरले नाही तर त्यांची मालमत्ता विकून पैसे वसूल केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून हिंसाचाऱ्याच्या घटनेचा आढावा घेतला. यावेळी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "नागपूर हिंसाचारानंतर पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही, नागरिक, पत्रकार यांनी दिले व्हिडीओ तपासले जात आहेत. यातून दंगेखोरांची ओळख पटवली जात आहे. आतापर्यंत 104 आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. यातील 92 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 12 अल्पवयीन असून त्यांना त्यानुसार शिक्षा होईल."

(नक्की वाचा- Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला)

सोशल मीडियाचं देखील ट्रॅकिंग सुरु 

नागपूरमधील आरोपींची संख्या वाढू शकते. अजूनही आरोपींची ओळख पटवण्याच काम सुरु आहे. पुराव्यांच्या आधारे जो व्यक्त दंगा करतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई पोलीस करणार आहेत. सोशल मीडियाचं देखील ट्रॅकिंग सुरु आहे. सोशल मीडियावर ही घटना घडावी यासाठी ज्यांनी उकसवलं, त्यांना देखील सहआरोपी केलं जाणार आहे. पोलिसांनी 68 सोशल मीडिया पोस्ट शोधून काढल्या आहेत, त्या डिलीट करण्यात आल्या आहेत. चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवल्या, पॉडकास्ट केले  त्या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

(नक्की वाचा-  पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)

दंगेखोरांकडून नुकसान वसूल करणार

नागपूरच्या हिसांचारात ज्यांचं नुकसान झालं, त्या सर्वांना नुकसान भरवाई येत्या 3-4 दिवसात दिली जाईल. जे नुकसान झालं आहे, ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. दंगेखोरांनी पैसे भरले नाही तर त्यांची मालमत्ता विकली जाईल. राज्यात या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. नागपूरचा शांततेचा इतिहास आहे. 1992 नंतर अशी मोठी घटना नागपुरात कधीही घडली नव्हती. आता दंगेखोराना सरळ केले नाही तर त्यांना सवय लागेल. त्यामुळे आरोपींवर कुठलीही दयामाया दाखवली जाणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.  

 (नक्की वाचा-  कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ; आणखी एका प्रकरणात नोटीस)

निर्बंधांत लवकरच शिथिलता आणणार 

खबरदारीचा उपाय म्हणून जे निर्बंध घातले आहेत, त्यामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यात लवकरात लवकर शिथिलता आणण्याचा प्रयत्न होत आहे. आजपासून टप्प्याटप्प्याने कर्फ्यू काढून टाकलं जाणार आहे. तरीही पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे. तसेच ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले त्यांना कर्माची फळं भोगावी लागतील. कठोरातील कठोर शिक्षा होत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही, असं देखील मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं. 

तर बुलडोझर चालवला जाईल

महाराष्ट्रात आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करतो. जिथे बुलडोझर चालवण्याची गरज असेल तिथे चालवला जाईल. जिथे चुकीचे काम होईल त्यांना चिरडले जाईल. कोणालाही सोडणार नाही, असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सोशल मीडियावरील काही पोस्ट बांगलादेशी असल्याचे दिसतेय. मात्र यामध्ये परदेशी संंबंध आहे असे आताच म्हणणे योग्य नाही. मात्र मालेगाव कनेक्शन दिसत आहे. मालेगावमधील पक्ष त्यांना मदत करत आहेत, आरोपीचे कार्यालयही तिथे आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: