कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत; कोणत्या एक्स्प्रेस रद्द?   

Kokan Railway : मुंबई-सीएसएमटी मार्गावरून कोकण रेल्वेनं वाहतूक करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

कोकण रेल्वेच्या (Kokan Railway) पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईतून कोकणच्या दिशेने रवाना होणाऱ्या काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही एक्स्प्रेसचे मार्ग बदलण्यात आले आहे, कोकण रेल्वे प्रशासनाने याबाबतची माहिती दिली. मुंबई-सीएसएमटी मार्गावरून कोकण रेल्वेनं वाहतूक करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर पेडने येथील बोगद्यामध्ये अतिवृष्टीमुळे (Konkan Railway Disrupted) मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कोकण रेल्वेला फटका बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही रेल्वे गाड्या उशिरानं आहेत. त्यामुळ प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या एक्स्प्रेस ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या. कोकण रेल्वेचे कर्मचारी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यरत आहेत. बोगद्यात जमिनीखालून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने ट्रॅकवर पाणी साचलं आहे. 

कोणत्या गाड्या रद्द?
मडगाव जं. - मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस

मडगाव जं. - सावंतवाडी रोड पॅसेंजर गाडी

मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी - जनशताब्दी एक्स्प्रेस

सावंतवाडी रोडवरून सुटणारी दिवा एक्सप्रेस 

वंदे भारत एक्सप्रेस

जनशताब्दी एक्सप्रेस

मांडवी एक्सप्रेस 

नक्की वाचा - बाप-बेटे चालत आले आणि सरळ रेल्वेखाली झोपले! भाईंदरमधील काळजाचा थरकाप उडवणारा Video

कोणत्या एक्स्प्रेस अन्य मार्गावर वळवल्या?
एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम जं. मंगला एक्सप्रेस 

गोव्यातील बोगद्यात पाणी साचल्याने मंगळवार दुपारपासून कोकण रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. गोव्यातील पेडणे येथे बोगद्यात पाणी साचल्याने मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावरील विविध ठिकाणी अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या. उत्तर गोव्यातील पेडणे येथे बोगद्यामध्ये पाणी साचल्याने आणि गळतीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या ठिकठिकाणी उभ्या राहिल्या होत्या, असे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​उपमहाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी NDTV मराठीला सांगितले. ते म्हणाले की मंगळवारी दुपारी 3 वाजल्यापासून रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली असून आज रात्री 10.30 पर्यंत ट्रॅक मोकळा होण्याची अपेक्षा आहे. गाड्या रद्द केल्या जात नसून सुमारे 4-5 गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबल्या आहेत. ते म्हणाले की प्रत्येक ट्रेनला जवळपास सात तासांचा विलंब अपेक्षित आहे. पेरनेम येथे ट्रॅक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Advertisement