जाहिरात

Dhule News: नगसेवक होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भाजप उमेदवाराचा प्रचारादरम्यान हार्टअटॅकने मृत्यू

Dhule News: कुसुमबाईंना नगरसेवकपदी विराजमान करण्यासाठी पाथरे परिवार व कार्यकर्ते जोरदार कामाला लागले होते. परंतु, आज मध्यरात्री कुसूमबाईंना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला.

Dhule News: नगसेवक होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भाजप उमेदवाराचा प्रचारादरम्यान हार्टअटॅकने मृत्यू

नागिंद मोरे, धुळे

Dhule News: पिंपळनेर शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार कुसुमबाई पाथरे (75) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आबासाहेब खंडू पाथरे यांच्या त्या आई होत्या.

पिंपळनेर नगरपरिषदेची यंदा प्रथमच निवडणूक होत असल्याने अनेक इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात भाजपकडून प्रभाग 2 ब मध्ये कुसूमबाई खंडू पाथरे ह्या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

(नक्की वाचा- Nagpur News: धक्कादायक! गांजा तस्करीप्रकरणी भाजपच्या युवा नेत्यासह 6 जणांना अटक)

कुसुमबाईंना नगरसेवकपदी विराजमान करण्यासाठी पाथरे परिवार व कार्यकर्ते जोरदार कामाला लागले होते. परंतु, आज मध्यरात्री कुसूमबाईंना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे पाथरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

प्रभाग 2 ब मध्ये तिरंगी लढत होती. यात कुसुमबाई पाथरे (भाजप), आशा महेश वाघ (काँग्रेस) व वसिमा आबिद शेख (शिवसेना) या उमदेवारांचा समावेश होता. पैकी कुसुमबाई यांचे आकस्मिक निधन झाल्याने आता या प्रभागातील निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत बरखास्त करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजूळ यांनी दिली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com