मी संधीसाधू तर शरद पवार कोण? अशोक चव्हाणांचा पलटवार

लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याने अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची टीकाही त्यांनी केली होती. शरद पवार यांच्या या टिकेला आता भाजप नेते, खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 'चव्हाण कुटुंबियांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद, देशाचे गृहमंत्रीपद, संरक्षणमंत्रीपद, अर्थमंत्रीपद दिले असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता.  तसेच लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याने अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची टीकाही त्यांनी केली होती. शरद पवार यांच्या या टिकेला आता भाजप नेते, खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. 

काय म्हणाले अशोक चव्हाण? 

'शरद पवार नेहमीच दांडगाईचे राजकारण करतात. शंकरराव चव्हाण यांना शरद पवार आणि वसंतदादामुळे काँग्रेस पक्ष सोडावा लागला. शरद पवारांचे शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर ही चांगले संबंध नव्हते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी माझ्यावर संधी साधूपणाचा आरोप करावा त्यांच्याबद्दल मी काय बोलू? जर मी संधीसाधू आहे तर शरद पवार कोण आहेत? असा टोला त्यांनी लगावला. तसेच त्यांचे बिलक्लिंटन पासून ते गावातल्या  सामान्य माणसापर्यंत संबंध आहेत ते मोठे नेते आहेत,असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच काँग्रेसमधून बाहेर पडण्यामागचे कारणही स्पष्ट केले. काँग्रेस पक्षात आज हयात नसलेल्या दिवंगत नेत्यांच्या त्रासाला, 14 वर्षे माझ्या विरोधामध्ये काँग्रेसमधल्या नेत्यांनी केलेल्या षडयंत्राला कंटाळून मी काँग्रेस पक्ष सोडला. मी केलेल्या कामाची कुठेही दखल घेतली जात नव्हती. आदर्श प्रकरण आजही सिद्ध झालेले नाही पण मला राजीनामा द्यावा लागला,' असे गंभीर आरोप त्यांनी यावेळी केले.  

नक्की वाचा: जनतेचे पैसे घरी घेऊन जायचे नसतात! श्रीकांत शिंदेंची मविआ नेत्यांवर सडकून टीका

दुसरीकडे, नांदेड उत्तर मतदार संघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून संगीता पाटील डक यांना तर काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये शरद पवार यांनी अब्दुल सत्तार यांना तर उद्धव ठाकरेंनी संगीता पाटील डक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मविआमधील या गोंधळावरुनही भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी जोरदार टीका केली. महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही, त्यांच्यामध्ये फक्त गोंधळ सुरु आहे. असाच गोंधळ राज्यपातळीवर  झाला तर आपण राज्याचा काय  विचार करणार असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी: "भाजपची मस्ती वाढली आहे, मी जिरवणार"; महादेव जानकरांचा हल्लाबोल